Saturday, October 1, 2022
Homeब-बातम्यांचाशेतकरी, आरोग्य, महिलांसाठी अर्थसंकल्पात तरतूद

शेतकरी, आरोग्य, महिलांसाठी अर्थसंकल्पात तरतूद

मुंबई: महाविकास आघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प असून राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोविड योध्यांचे आभार मानले. अर्थसंकल्पात यंदा आरोग्य विभागासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. कोरोनामुळे आरोग्य सेवा सुधारित करण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे पवार यांनी सांगितले.

महिला दिनाच्या दिवशी मोठी घोषणा करण्यात आली आहे. राजमाता गृहस्वामिनी योजना घोषित केली आहे. महिलेच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात सूट मिळणार आहे. १ एप्रिल २०२१ पासून ही योजना सुरु होत आहे.

दरम्यान, राज्यातील ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थिनींना गावापासून ते शाळेपर्यंत जाण्यासाठी बस मोफत उपलब्ध करून देण्याची सोय करण्यात आली आहे. या योजनेला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अस नाव देण्यात आले आहे.     

बर्ड फ्लू सारख्या रोगांना आळा घालण्यासाठी पुणे येथे जैव सुरक्षा प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी २०० कोटी दरवर्षी देण्यात येतील. यामुळं शेती क्षेत्रातील संशोधनाला चालना मिळेल. आरोग्यसेवेसाठी श्रेणीवर्धन आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी ७ हजार ५०० कोटींचा निधी देण्यात येणार आहे. यातून राज्यातील आरोग्यव्यवस्था मजबूत असून नवीन वैद्यकीय महाविद्यालये, कॅथलॅब यांची स्थापना करण्यात येईल. आरोग्य सेवा राज्यातील प्रत्येक नागरिकाला सुकर व्हावी यासाठी नागरी आरोग्य कार्यालय सुरू करणार असल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले.

अर्थसंकल्पातील काही महत्वाचे मुद्दे:

कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बळकटीकरणासाठी २ हजार कोटी तरतूद करण्यात येणार आहे. कृषी पंपाच्या सौरऊर्जा जोडणीसाठी १ हजार ५०० कोटींची निधी महावितरणला देण्यात येणार आहे. ३ लाखा पर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली.

  • गोसीखुर्द प्रकल्पासाठी १ हजार कोटीची तर १२ धरणांच्या बळकटीकरणासाठी ६२४ कोटी रुपयांची तरतूद.
  • घरकुल योजनेसाठी ६ हजार ८०० कोटी ची तरतूद करण्यात आली. यातून गरिबांना हक्काचे घर मिळण्यास मदत होईल.
  • परिवहन विभागासाठी २५०० कोटीची तरतूद करण्यात आली.
  • वेरूळचे ऐतिहासिक महत्व जाणून पर्यटन वाढीच्या दृष्टीने नवे विमानतळ उभारणार. पुण्यासाठी नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणार.
  • जीर्ण अवस्थेत असलेल्या शाळांच्या पुनरुज्जीवनासाठी ३००० कोटीची तरतूद करण्यात आलीय.
  • मुंबई-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला कॅबिनेटची मंजुरी.
  • युवकांसाठी नवीन कौशल्य विद्यापीठ राज्यात सुरू करण्यास परवानगी देण्यात आलीय. या विद्यापीठातून रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार.
  • रस्ते विकासासाठी १२ हजार ९५० कोटी च्या निधीची तरतूद.
  • मुंबईसाठी महत्वाच्या असलेल्या कोस्टल रोडचं काम २०२४ पूर्वी पूर्ण करण्याचा निर्धार.
  • एसटी महामंडळासाठी १४०० कोटींची घोषणा.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments