होळी,धुलिवंदन उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यास मनाई.

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

पुणे : राज्यात बरोबरच  पुणे जिल्हयात सुद्धा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने खबरदारीचे उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्यासाठी पुणे जिल्हयाचे ग्रामीण कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक व खाजगी मोकळया जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळया जागा येथे २८ मार्च २०२१ रोजी साजरा होणारा होळी उत्सव तसेच २९ मार्च २०२१ रोजी साजरा होणारा धुलीवंदन व रंगपंचमी उत्सव साजरे करण्यास मनाई करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

कोरोना प्रादुर्भाव झपाटयाने पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. जिल्हयातील यात्रा, उत्सव यांच्यावर सुद्धा निर्बंध लावण्यात आले आहे. धुलीवंदन व रंगपंचमी दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी होळी, धुलिवंदन उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यास मनाई केली आहे.

याच प्रमाणे मुंबई येथे सुद्धा होळी, धुलिवंदन उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी याबाबत माहिती दिली आहे. सदर मनाई आदेशाचे पालन करुन नागरिकांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे तसेच सदर आदेशामधील कोणत्याही तरतुदीचा भंग केल्यास संबंधिताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५ व कायदयातील इतर तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *