मोदी सरकारवर पृथ्वीराज चव्हाणांचा नवा आरोप, सादर केली ‘ही’ आकडेवारी…

मुंबई: महाराष्ट्रात कोरोना लसीकरण मोठ्या वेगाने सुरू आहे. मात्र, याच वेळी महाराष्ट्रात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्याचं दिसत आहे. राज्यातील अनेक लसीकरण केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याचं समोर आलं. यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. इतर राज्यांच्या तुलनेत राज्याला लस कमी दिल्याचा दावा राज्य सरकारने केला तर केंद्राने महाराष्ट्राला सर्वाधिक लस दिल्याचं म्हटलं आहे. याच आरोप-प्रत्यारोप दरम्यान आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि एक पत्रक काढून केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभेतील आकडेवारी आपल्या पत्रकार जाहीर केली आहे. ही आकडेवारी जाहीर करत पृथ्वीराज चव्हाण यांनी आरोप केला आहे की, केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या तुलनेत इतर राज्यांना कशा प्रकारे वैद्यकीय उपकरणे अधिक दिली आहेत.
पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करत म्हटलं, “महाराष्ट्राला फक्त लस देण्यातच नाही तर कोरोना काळात महत्वाची वैद्यकीय उपकरणे देण्यात सुद्धा केंद्र सरकारने दुजाभाव केला आहे. लोकसभेतील आकडेवारीनुसार गुजरात आणि उत्तरप्रदेश राज्यात रुग्णसंख्येच्या व्यस्त पटीने N95 मास्क, पीपीई किट्स आणि व्हेंटिलेटर्स केंद्र सरकारने दिले आहेत.”
पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढे म्हटलं, पंतप्रधान हे विसरताना दिसत आहेत की, ते केवळ गुजरात, उत्तरप्रदेश आणि इतर भाजपशासित राज्यांचे नाही तर संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत.
महाराष्ट्राला फक्त लसी देण्यातच नाही तर कोरोना काळात महत्वाची वैद्यकीय उपकरणे देण्यातसुद्धा केंद्र सरकारने दुजाभाव केला आहे. लोकसभेतील आकडेवारीनुसार गुजरात आणि उत्तर प्रदेश राज्यात रुग्णसंख्येच्या व्यस्त पटीने N95 मास्क, पीपीई किट्स आणि व्हेंटीलेटर्स केंद्र सरकारने दिले आहेत. pic.twitter.com/MdYDR4Ly3W
— Prithviraj Chavan (@prithvrj) April 10, 2021
पाहूयात ही आकडेवारी काय सांगते
गुजरात
N95 मास्क – ९६२३
PPE किट्स – ४९५१
Ventilators – १३
उत्तरप्रदेश
N95 मास्क – ३९१६
PPE किट्स – २४४६
Ventilators -७
पश्चिम बंगाल
N95 मास्क – ३२१४
PPE किट्स – ८४८
Ventilators – २
तमिळनाडू
N95 मास्क – २२१३
PPE किट्स – ६३९
Ventilators – २
महाराष्ट्र
N95 मास्क – १५६०
PPE किट्स – ७२३
Ventilators – २
केरळ
N95 मास्क – ८१४
PPE किट्स – १९२
Ventilators – १