पंतप्रधानांची ‘परीक्षा पे चर्चा’, काय आहे यंदाची खासियत?
दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘परीक्षा पे चर्चा’ या खास कार्यक्रमातून तरुणांशी संवाद साधणार यासंबंधी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ‘koo’ वरून यासंबंधी माहिती दिली होती.ट्विटरला स्पर्धा म्हणून काढण्यात आलेलं ‘koo’ हे ॲप्लिकेशन बरंच चर्चेत होतं. या स्वदेशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक नेत्यांनी आपलं अकाऊंट उघडलं होतं. प्रकाश जावडेकरांनीही या प्लॅटफॉर्मवर आपलं खातं उघडून त्यावर सरकारच्या कामांचे अपडेट्स द्यायला सुरवात केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमासंदर्भाची एक पोस्ट प्रकाश जावडेकरांनी शेअर केली होती ज्यात,‘अखेर प्रतिक्षा संपली! परीक्षा पे चर्चा २०२१, प्रेयरणादायी कार्यक्रमातून नरेंद्र मोदी पुन्हा आले आहेत. आतापर्यंतचा हा सगळ्यात मोठा क्षण असणार आहे. त्यांच्याशी संवाद साधा, परीक्षेच्या तणावातून मुक्त होण्यासाठी त्यांच्याकडून मंत्र जाणून घ्या. ते फक्त परीक्षेत मदतच नाही तर आयुष्यावरही मार्गदर्शन करतील’ असं त्यांनी लिहीलं होतं. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोर्ड परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांवर मानसिक तणाव येऊ नये म्हणून मोदी त्यांना टीप्स देतात.
परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात ९ वी ते १२ मध्ये शिकणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. कोरोना संसर्गामुळे यंदाचा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा १६ फेब्रुवारी २०१८ ला परीक्षा पे चर्चामधील पहिला कार्यक्रम पार पडला होता. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. या वर्षीच्या कार्यक्रमासाठी ८.६ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केलीये. यंदाची खासियत म्हणजे विद्यार्थ्यांसह त्यांचे आई वडील, शिक्षक देखील सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी २.२५ लाखांहून अधिक शिक्षकांनी तर ७८,००० पालकांनी नोंदणी केलीये. नोंदणी करण्याची अंतिम तारीख १४ मार्च आहे.