नाशिक दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त; म्हणाले…

The Modi government is based on lies; Owaisi targets Modi
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

नरेंद्र मोदींनी ट्वीट करून केलं दुःख व्यक्त

नाशिक : नाशिक शहरातील महापालिकेचे झाकीर हुसेन रुग्णालय आहे. हे रुग्णालय कोविड रुग्णांसाठी जीवदान ठरत आहे. मात्र ऑक्सिजन पुरवठा आणि कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे हे रुग्णालय नेहमी चर्चेत राहिले आहे. नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी १२.३० च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला. ऑक्सिजनच्या प्रेशरमुळं नोझल तुटले. त्यामुळे ही ऑक्सिजन गळती झाल्याची माहिती समोर येत आहे.
नाशिकच्या ऑक्सिजनची गळती झाल्यानंतर रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली. या रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंकला गळती लागल्याने हजारो लीटर ऑक्सिजन वाया गेले. यावेळी अनेक कोव्हिड रुग्णांवर उपचार सुरु होते. यातील १५० लोक व्हेंटिलेटरवर होते. रुग्णालयात अचानक ऑक्सिजन लीक झाल्याने रुग्णांना होणारा पुरवठा बंद झाला. त्यामुळे व्हेंटिलेटवर असलेल्या रुग्णांपैकी २२ जणांचा तडफडून मृत्यू झाला. यात ११ महिला आणि ११ पुरुषांचा समावेश आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. मोदी यांनी या दुर्घटनेत दगावलेल्या नागरिकांच्याप्रती ट्विटरवर संवेदना व्यक्त केल्या आहेत.
“ऑक्सिजन टँक लीक झाल्यामुळे नाशिकमधील रुग्णालयात घडलेली घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याने मन हेलावलं. दु:खाचा डोंगर कोसळलेल्या नातेवाईकांचं सांत्वन”, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक दुर्घटनेत दगावलेल्या नागरिकांच्याप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *