Monday, September 26, 2022
Homeब-बातम्यांचापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली कोरोनाची लस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली कोरोनाची लस

दिल्ली: आज पासून ६० वर्षावरील ज्येष्ठ व्यक्तींना कोरोना लसीचा लाभ घेता येणार आहे. हा लसीकरणाचा तिसरा टप्पा असून या टप्प्यात ६० वर्षपूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ४५ वर्षांवरील सह-व्याधी (कोमोब्रीड) असणाऱ्या नागरिकांना सुद्धा लसीकरण देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी लसीकरण मोहिमेत सामील झाले आहेत. राजकीय नेत्यामध्ये  सर्प्रथम कोरोनाची लस त्यांनी घेतलेली आहे. मोदींनी ट्विट करून माहिती दिली.

मोदी ट्वीट करताना म्हणाले, मी एम्स रुग्णालयात कोरोनाचा पहिला डोझ घेतला. कोरोना विरोधातल्या युद्धात जगातील लढाईला बळ देण्यासाठी आपल्या डॉ. आणि वैज्ञानिकांनी ज्या जलदगतीने काम केले ते कौतुकास्पद आहे. तसेच प्रसंगी नरेंद्र मोदी यांनी लसीकरणासाठी पात्र देशवासियांना आवाहन केल असून भारताला सर्वे मिळून कोविड मुक्त बनवूयात अस म्हणाले आहे. यावेळी नरेंद्र मोदी यांना भारत बायोटेक यांची कोव्हॅक्सिन लस टोचण्यात आली.

आज पासून लसीकरणाचा तिसरा टप्पा

लसीकरणाच्या या तिसऱ्या टप्प्यात पालिकेच्या व शासकीय रुग्णालयासह खासगी होस्पिटल्समध्ये देखील लसीकरण करण्यात येणार आहे. शासकीय रुग्णालयात लसीकरण मोफत असून खासगी हॉस्पिटल्स मध्ये अडीचशे रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. या दरम्यान, केंद्र शासनाची ‘जन आरोग्य योजना’ राबिविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे केंद्र अथवा राज्य शासनाच्या आरोग्य विमा राबवत असलेल्या मुंबईतील त्रेपन्न खासगी रुग्नालाताची महिती पालिकेकडे आली आहे.

तसेच, लसीकरणासाठी नागरिकांनी वयाबाबतचा योग्य पुरावा सादर करणे आवश्यक आहे. ‘कोविन डिजिटल प्लॅटफॉर्म’ हा १ मार्च सकाळी ९ वाजल्यापासून खुला करण्यात आला आहे.  

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments