|

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गमछा इतक्या रुपयांचा…

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वापरत असलेल्या वस्तूंबाबत नेहमीच मोठ्या चर्चेत असतात. मोदी कुठून कपडे घेतात, कुठल्या कंपनीचे घडयाळ वापरतात याबाबत अनेकांना उत्सुकता असते. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी वापरता असलेल्या गमछाच्या (उपरणे) बाबतही अशीच चर्चा होती. नरेंद्र मोदी यांनी आपण वापरत असलेल्या उपरणे बाबत ट्वीट केले असून त्याची किमंत २ हजार असल्याचे समोर आले आहे.

मोदी यांच्या ड्रेसिंग सेन्सची चर्चा सगळीकडे असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळेजण मास्क वापरत असतांना नरेंद्र मोदी उपरणे वापरताना दिसत होते. १ मार्च पासून कोरोना लसिकरणाला सुरुवात झाली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस घेतली. यावेळी त्यांनी गळ्यात घातलेल्या गमछा वरून सोशल मिडीयावर पूर्ण देशभरात चर्चा झाली होती. सोमवारी नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून या संदर्भात माहिती दिली आहे.

“तुम्ही मला गमछा घातलेले पाहिले आहे. हे अत्यंत आरामदायी आहे. आज मी काकतीपापुंग येथील डेव्हलपमेंट ब्लॉकच्या विविध बचतगटाने बनविलेले गमछे विकत घेत आहे” अशे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पेहराव वरून त्यांच्या चाहत्यांनी त्यांना त्वीत्स च्या माध्यमातून प्रश्न विचारलेले लक्षात आले आहे. मोदीजींच्या जॅकटवरना सुद्धा त्यांना याआधी विचारण्यात आले आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *