पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा निर्णय घेतील तो मान्य-चंद्रकांत पाटील
पुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात गुप्त बैठक झाल्याची चर्चा आहे. यानंतर राजकीय चर्चांना उधान आल आहे. भाजपकडून आज पहिल्यांदाच याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शहा-पवार भेटी बाबत सूचक वक्तव्य केल आहे.
चंद्रकात पाटील म्हणाले, अमित शहा रात्रीच्यावेळी शरद पवार यांना भेटल्याचे समजते. अमित शहा यांना भेटण्याची वेळ रात्रीची असते. शरद पवार आणि अमित शहा यांना अहमदाबादला जाऊन का भेटले याचा विचार झाला पाहिजे. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. आमचा आमच्या नेत्यांच्या विचारावर सर्वोच्च निष्ठा आहे. त्यामुळे ते जे सांगतील तोच निर्णय आमच्यासाठी अंतिम असेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
भाजप राष्ट्रवादीच ठरलंच तर गेल्यावेळ सारख शपथविधी झाल्यावर कळेल अस सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केल. शरद पवार-अमित शहा यांच्या भेटी बाबत विचारले असता ते म्हणाले, राजकारणात अशा भेटी झाल्या पाहिजे. राजकारण राजकारणाच्या जागी असत. मात्र, नेत्यांनी एकमेकांना भेटल पाहिजे. अलीकडच्या काळात राज्यात महाविकास आघाडीच सरकार आल्यापासून असा भेटीगाठी कमी झाल्या होत्या. अमित शहा–शरद पवार यांची भेट राजकीय कारणासाठी होते अस नाही. त्यामागे एखादे समजापयोगी काम असू शकते. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.