राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची प्रकृती अस्वस्थ

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना प्रकृती अस्वस्थ्यामुळे दिल्लीच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्रकृती अस्वस्थ्याचे नेमके कारण मात्र अद्यापही समजू शकलेले नाही. आर्मी हॉस्पिटल येथे रूटीन तपासणीसाठीच रामनाथ कोविंद आले होते. त्यांना छातीत दुखू लागल्यानेच हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. आता त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती येत आहे. दिल्लीच्या हॉस्पिटलने त्यांच्या आरोग्याबाबतचे एक बुलेटिन जाहीर केले आहे. बुलेटीनमध्ये रामनाथ कोविंद यांची प्रकृती स्थिर असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

राष्ट्रपती दोन दिवसांच्या हरिद्वार दौऱ्यावर जाणार होते, पतंजली योगपीठाचा जो पदवीदान समारंभ आहे, यामध्ये राष्ट्रपती सहभागी होणार होते. मात्र मध्येच त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांचा हा दौरा रद्द करावा लागलेला आहे. रामनाथ कोविंद यांचे सध्याचे वय हे ७५ वर्षे असून त्यांना आज शुक्रवारी नियमित तपासणीसाठी आणण्यात आले होते. या चाचणी दरम्यानच त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना दिल्लीच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्यांची तब्येत आता स्थिर असल्याचे हॉस्पिटलकडून सांगण्यात आले आहे. सध्या डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून असल्याची माहिती मिळत आहे. लवकर याबाबतची आणखी माहिती देण्यात येईल, असे सांगितले जात आहे.

३ मार्चला कोरोना लसीचा पहिला डोस

दरम्यान राष्ट्रपती कोविंद यांनी ३ मार्चला कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. आर्मी रिसर्च आणि रिफरल हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. राष्ट्रपती कोविंद यांनी लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात परवानगी असलेल्या सर्वांनी कोरोना लस टोचून घेण्याचं आवाहन केलं होतं.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *