‘स्वरा भास्कर’वर कौतुकांचा वर्षाव!

Praise on 'Swara Bhaskar'!
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई: अभिनेत्री स्वरा भास्कर ही आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असते. देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडींवर ती रोखठोकपणे प्रतिक्रिया देते. अनेकदा यामुळं तिला ट्रोल देखील केलं जातं. मात्र यावेळी स्वरानं केलेल्या एका कृतीसाठी सर्वजण तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. तिनं कचरापेटीमध्ये सापडलेल्या एका मुलीला दत्तक घेतलं आहे. या मुलीसोबतचे तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.
आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्तानं स्वरा उत्तर प्रदेशमधील बदायु येथे गेली होती. त्यावेळी तिनं तेथील एका अनाथ आश्रमाला भेट दिली. खरं तर तेथील मुलांना मदत करण्याच्या उद्देशानं ती तेथे गेली होती. परंतु या ठिकाणी तिचं लक्ष एका गोंडस मुलीनं वेधून घेतलं. या मुलीची कथा ऐकून स्वरा अत्यंत भावूक झाली. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. कारण ही मुलगी त्या अनाथआश्रमाच्या संचालिका प्रियांका जौहरी यांना एका कचऱ्याच्या डब्यात सापडली होती. या मुलीला दत्तक घेण्याचा निर्णय स्वरानं घेतला आहे. ही मुलगी पुढील काही काळ अनाथआश्रमात राहील परंतु तिचा संपूर्ण आर्थिक खर्च स्वरा भास्कर उचलणार आहे. अगदी तिच्या पालनपोषणापासून शिक्षणापर्यंत. ज्या वेळी ही मुलगी थोडी मोठी होईल त्यावेळी स्वरा तिला आपल्या घरी घेऊन जाईल.
संचालिका प्रियांका यांनी दिलेल्या माहितीनुसार स्वराला लहान मुलं सांभाळण्याचा अनुभव नाही. शिवाय सध्या सर्वत्र कोरोनाचं वातावरण आहे. अशा परिस्थितीत अनुभव नसलेली व्यक्ती काही महिन्यांच्या मुलीचा सांभाळ करु शकेल का याबाबत सर्वांनाच शंका होती. त्यामुळं स्वरानं या मुलीला आणखी काही काळ या आश्रमातच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. स्वरानं या आश्रमातील सर्व मुलांच्या शिक्षणासाठी काही आर्थिक मदत देखील केली आहे. तिचे या मुलीसोबतचे फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. हे फोटो पाहून स्वरावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *