राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसकडून राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेचे कौतुक
मुंबई: महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर हा दुसरा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. कोरोना नंतरचा अर्थसंकल्प असल्याने सगळ्यांचे याकडे लक्ष लागले होते. राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अर्थसंकल्पात राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना सुरु केल्याबाबत कौतुक केले आहे तर खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून एसटी महामंडळ १ हजार ५०० सीएनजी बस घेण्याच्या निर्णयाबाबत स्वागत केले आहे.
अर्थसंकल्पावर कोण काय म्हणाले?
राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अर्थसंकल्पात राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनचे कौतुक केले आहे. “घराच्या लक्ष्मीला सन्मानाने आणि आत्मविश्वासाने संजात वावरता येऊन तिच्यात नवीन उमेद जागवणारी योजना म्हणजे ‘राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना’ कुटुंब उभे राहण्यासाठी एक पुरुष जेवढे कष्ट घेत असतो त्यापेक्षा जास्त कष्ट ते कुटुंब एकत्र बांधून ठेवण्यामागे एक स्त्री घेत असते आणि या कुटुंबाला एकत्र आणणारी गोष्ट म्हणजे ‘आपल स्वताच घर’ आणि यापुढे आपल्या स्वप्नातल घर त्यापेक्षा जास्त जर कुटुंबातील स्त्रीच्या नावाने खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कामध्ये भरीव अशी सवलत देणारी तुमच्या आमच्या सर्वांची योजना म्हणजे ‘राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना’
आमदार रोहित पवार यांनी सर्व विभागांना न्याय देण्याच प्रामाणिक काम अर्थसंकल्पात केल्याचे सांगितले. चोहोबाजूने येणाऱ्या तुफानाला टक्कर देत राज्याच्या विकासाची नौका बजेटच्या माद्यमातून पार केली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी एसटी महामंडळ १ हजार ५०० सीएनजी बस घेण्याबाबत स्वागत केले आहे. पुढे त्या म्हणाल्या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले योजने अंतर्गत शाळेला जाणाऱ्या ग्रामीण भागातील मुलींचा प्रवास मोफत केला आहे. याच बरोबर एसटी महामंडळ १ हजार ५०० सीएनजी हायब्रीड बस उपलब्ध करून देणारा हा महत्वाचा निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले.