|

MPSC ची तारीख पुढे ढकलणार? मुख्यमंत्र्यांनी बोलविली बैठक

MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी !
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई: MPSC पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यासह सराव स्थरातून होत आहे. काही वेळा पूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करू परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी केली होती. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बैठक बोलविली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आणि अधिकारी यांच्या झूम द्वारे ही बैठक होणार आहे. परीक्षा होणार कि नाही याबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

            लोकसेवा आयोगाची ११ एप्रिल रोजी संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याने ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी होत आहे. ३० एप्रिल पर्यंत राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर शनिवार, रविवारी राज्यात कडक लॉकडाऊन असणार आहे. यामुळे ११ एप्रिल रोजी परीक्षा कशी होणार याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी यावर लवकर निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. तसेच MPSC समन्वय समितीच्या वतीने सुद्धा १ महिना परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी करण्यात आली आहे. MPSC समन्वय समितीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आयोगाचे सचिव यांना पत्र लिहून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *