गृहमंत्री बदलाच्या चर्चांना उधान
सचिन वाझे प्रकरण भोवणार
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके भरलेले वाहन सापडले होते. त्यानंतर वाहन मालकाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या सर्व प्रकारात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव समोर आले. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचीसुद्धा बदली करण्यात आली आहे. पोलीस दलातील फेरबदला नंतर गृहमंत्री बदलाची चर्चा होतांना दिसत आहे.
तसेच याबाबत विरोधी पक्ष सुद्धा आक्रमक झाला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्र लिहून आयुक्तांची बदली करून चालणार नाही तर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्या अशी मागणी केली. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करून विरोधकांच्या टीकेच्या धार कमी केली आहे. केवळ पोलीस अधिकाऱ्यांचा बळी दिला जात असल्याचा आरोप सरकारवर करण्यात येत आहे. पोलीस दलामध्ये नाराजी आहे.
शुक्रवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्ली येथे जाऊन भेट घेतली. त्यानंतर गृहमंत्री यांच्या बदलाच्या चर्चांना उधान आल आहे. अनिल देशमुखांनी हा दावा फेटाळून लावला आहे. मात्र, शरद पवार यांच्या भेटीमागे हेच कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.
अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरु असतांना गृहमंत्रीपदासाठी जयंत पाटील याचं नाव पुढे येत आहे. जयंत पाटील यांच्याकडे सध्या जलसंपदा मंत्री आहे. जयंत पाटील हे रष्ट्रावादी कॉंग्रेस मधील अत्यंत अनुभवी आहेत. यापूर्वी त्यांनी अर्थ, संसदीय कामकाज, ग्रामविकास अशी अनेक खाते त्यांनी सांभाळली आहेत. शरद पवार यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख आहे. त्याच बरोबर महाविकास आघाडीतील पक्षांसोबत चांगले संबंध आहेत.