वाझे प्रकरण गृहमंत्र्यांना भोवणार का?

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

राष्ट्रवादी काँग्रेसने बोलवली तातडीची बैठक

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके असलेले वाहन लावण्यात आले होते. पहिल्या काही दिवसात ते वाहन चोरीचे आहे असे सांगण्यात आले. ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या मालकीचे वाहन असल्याचे समोर आले होते. त्यांनी त्याबाबत पोलिस ठाण्यात जबाब सुद्धा नोंदवला होता. मात्र काही दिवसा नंतर त्यांची हत्या करण्यात आली.
मनसुख हिरेन यांच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या जबाबात सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांनी हत्या केल्याचे आरोप केला होता. याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात आवज उठवला होता. तसेच वाझे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. आता या प्रकरणाचा तपास NIA करत आहे. पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना २५ मार्च पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

यानंतर आता राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. NIA कडून न्यायालयात अजुन काही अधिकाऱ्यांना अटक करण्यात येईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर विरोधी पक्षाकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या मंत्र्याची सोमवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरला तातडीची बैठक बोलवली आहे. यावेळी सचिन वाझे प्रकरणात गृहाखात्यावर होत असलेल्या टिके संदर्भात चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. रविवारी बारामती येथे शरद पवार यांना सचिन वाझे प्रकरणा बाबत विचारण्यात आले होते. त्यावेळी पवार यांनी यावर बोलणे टाळले होते.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *