पोलिसांनी जमिनीवर राहायला हवे चित्रपटातील पोलीस आणि खऱ्या पोलिसांमध्ये फरक असतो- मुख्यमंत्र्यांचा सल्ला
मुंबई: प्रत्यक्षात पोलिसांना जमिनीवर राहून काम करावे लागते. चित्रपटात आणि प्रत्यक्षातील पोलिसांमध्ये जमीन अस्मानचा फरक असता असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. पोलिसांच्या प्रत्येक कृतीवर प्रश्न विचारला जातो. त्यामुळे पोलिसांनी प्रशिक्षणाबरोबर प्रसंगावधान बाळगायला हवे अस मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी नाशिक येथील पोलीस प्रबोदिनीच्या ११८ दीक्षांत सोहळ्यात बोलत होते. यावेळी ठाकरे यांनी पोलीस उप निरीक्षक पदाचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांना संबोधित करत होते. पोलिसांना अनेक भूमिका बाजावाव्या लागतात असेही ते यावेळी म्हणाले.
कोरोनाचा विषाणू जसा आपले रूप बदलत आहे. त्याचा आता सेकंड म्युटंट झाला आहे. तसेच काही आता रूप बदलणारी गुन्हेगारी झाली आहे. गुन्हेगारीचे आता ऑनलाईन आणि त्या गुन्हामध्ये वाढू लागली आहे. बँकिंग मधील ऑनलाईन गुन्ह्याचा बंदोबस्त करावा लागणार आहे. गुन्हे ऑनलाईन असले तरीही त्यांना प्रत्यक्ष जाऊन बेड्या घालाव्या लागणार आहे.
तुमच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी
खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर जल्लोष होणारच. पण बेभान होवून चालणार नाही. जोश आणि होश यांचे तारतम्य बाळगून वागावे. त्यासाठी भानावर रहावेच लागेल. प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडत आहात. तुमचे कुटुंबीय आतुरतेने वाट पाहत आहेत. आता तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचे आहात. या कुटुंबाला तुमचा आधार राहणार आहे. तुम्हाला रक्षक, पुत्र म्हणून काम करावे लागणार आहे. लोक तुमच्याकडे विश्वासाने येणार आहेत. त्या जनतेचा विश्वास तुम्ही सार्थ ठरवाल असा विश्वास असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.