लाच घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याला रंगेहात पकडले
कामशेत येथील धक्कादायक प्रकार
पुणे: पुणे ग्रामीण पोलीस दलातील एक पोलीस निरीक्षक, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यासह कर्मचाऱ्यास १ लाखाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने केली.
कामशेत पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम व त्यांच्या कर्मचारी महेश दौडकर असे लाच स्वीकारण्यात आलेल्यांची नावे आहे तक्रारदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्यात त्यांना अटक सुद्धा झाली आहे. त्यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. या प्रकरणात आपले म्हणणे (से) मांडण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यातील अडीच लाख रुपये देखील देण्यात आहे होते. पण न्यायालयाने जामीन फेटाळला. त्यानंतर तक्रारदार जामिनासाठी सत्र न्यायलयात गेले होते.
त्यावेळी पुन्हा एकदा सत्र न्यायलयात म्हणणे (से) मांडण्यासाठी पोलिसांनी अडीच लाख रुपये मागितले होते. त्यावेळी तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार याची केली होती. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज ही कारवाई करण्यात आली. त्यावेळी तडजोडी अंती १ लाख रुपये घेतांना रंगेहात पकडले आहे.