Sunday, September 25, 2022
Homeब-बातम्यांचापिंपरी-चिंचवड : रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या चौघांना अटक

पिंपरी-चिंचवड : रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या चौघांना अटक

पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नामांकित खासगी दवाखाने आणि कोविड सेंटरमधील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हा गोरंखधंदा सुरू असल्याचं समोर आलं आहे. रेमडेसीवीरचे एक इंजेक्शन ते तब्बल ११ हजारांपर्यंत विकत होते, आणि आतापर्यंत ४० इंजेक्शन विकल्याची कबुली त्यांनी दिली आहे.
या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बनावट गिऱ्हाईक पाठवून या प्रकरणाचा छडा लावला. या प्रकरणी पोलिसांनी आदित्य मैदर्गी, प्रताप जाधवर, अजय मोराळे आणि मुरळीधर मारुटकर यांना अटक केली आहे. त्यापैकी अजय मोराळे हा मेडिपॉइंट हॉस्पिटलमध्ये तर मुरलीधर मारुटकर बाणेरमधल्या कोविड सेंटर मध्ये ब्रदर म्हणून काम करत होते. एक इंजेक्शन ११ हजारांपर्यंत ते विक्री करत होते. आतापर्यंत त्यांनी जवळपास ४० इंजेक्शन विकल्याचं मान्य केलं आहे. यात आणखी कुणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिस करत आहेत.
दरम्यान, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी शहरातील तीन मोठ्या हॉस्पिटला नोटीस बजावली आहे. आदित्य ब्रिला हॉस्पिटल, डी वाय पाटील हॉस्पिटल आणि लोकमान्य हॉस्पिटलचा त्यात समावेश आहे. रुग्णालयाबाहेर दाखल असलेल्या रुग्णांना रेमडेसीवीर इंजेक्शन अधिक किमतीत विकल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून ४८ तासात अहवाल सादर करावा असं नोटिसमध्ये रुग्णालयांना सांगण्यात आलं आहे.
रेमडेसीवीर इंजेक्शनच्या काळ्या बाजाराबाबत गेल्या काही दिवसांत अनेक बातम्या समोर येत आहेत. मुंबई पोलिसांनीही नुकतीच काही जणांना इंजेक्शनचा काळा बाजार केल्याप्रकरणी अटक केली होती. गरज असलेल्या रुग्णांना इंजेक्शन मिळत नसल्याने प्रशासनानं आता या प्रकरणी कठोर कारवाई सुरू केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments