पिंपरी-चिंचवड शहरात 2 हजार 102 कोरोना रुग्णांची वाढ, 2 हजार 363 ‘कोरोनामुक्त’

पिंपरी-चिंचवड : पुणे शहरासोबतच पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दरम्यान आज दिवसभरात शहरात 2 हजार 102 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. नवीन कोरोना रुग्णांबरोबर शहरातील एकून कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 17 हजार 495 इतकी झाली आहे. तसेच आज दिवसभरात 2 हजार 363 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयाततून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात आजपर्यंत 1 लाख 92 हजार 784 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. शहरात 21 हजार 619 रुग्ण वेगवेगळ्या रुग्णलयात उपचार घेत आहेत. आज दिवसभरात 95 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शहारात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत 4 हजार 649 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये शहराबाहेरील रुग्णांचा सुद्धा समावेश आहे. अशी माहिती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.