Friday, October 7, 2022
Homeब-बातम्यांचापिंपरी-चिंचवड : भाजप नगरसेविकेच्या मुलाने स्वत:वर झाडली गोळी

पिंपरी-चिंचवड : भाजप नगरसेविकेच्या मुलाने स्वत:वर झाडली गोळी

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील भाजप नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्या मुलानं स्वत:वर गोळी झाडून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गोळी झाडल्याचा आवाज झाल्यानंतर कुटुंबीयांनी प्रसन्नच्या खोलीकडं धाव घेतली. तेव्हा सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला. जखमी अवस्थेत प्रसन्नला थेरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

रविवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास चिंचवडे यांच्या राहत्या घरी ही घटना घडली. चिंचवडमधील वाल्हेकरवाडी रस्त्यावर चिंचवडे कुटुंब राहतं. रात्री नऊच्या सुमारास प्रसन्न यानं कुटुंबासोबत जेवण केलं. त्यानंतर तो स्वत:च्या खोलीत गेला आणि वडिलाच्या परवानाधारक पिस्तुलातून स्वत:वर गोळी झाडून आयुष्य संपवलं, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. सोमवारी पहाटे काळेवाडी येथील समशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. गोळी झाडून घेण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. दरम्यान, ही आत्महत्या आहे की इतर काही प्रकार आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments