सलग बाराव्या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ
पुणे: बऱ्याच दिवसांपासून वाढत असलेल्या पेट्रोल आणि डीझेल च्या किमतीमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. अश्यातच, पेट्रोलियम कपन्यांनी आज शनिवारी सलग १२ व्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. या दरवाढीने मुंबईत पेट्रोल मध्ये ३७ पैश्यांची वाढ झाली आहे. तर डिझेल हि ३९ पैश्यानी महागल आहे. मुंबईत आज पेट्रोल ९६.९४ रुपये आहे. तर डीझेल च्या किमतीत ८८.०१ रुपयांची पातळी ओलांडली आहे. दरम्यान, पेट्रोलने शंभरी ओलांडलेल्या शहरांची संख्या आज वाढली आहे. या सगळ्यात सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र चांगलीच चोट बसत असून लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
पेट्रोलियम कंपन्यांचा इंधन दरवाढीचा धडका कायम आहे. इंधन दरवाढीने लवकरच महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमतीने ६५ डॉलरची पातळी ओलांडली आहे. ब्रेंट क्रूड चा भाव ६३ डॉलर आहे. त्यात १.८ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या तेरा महिन्यातील हा उच्चांकी दर होता.