मास्क कारवाई बाबत उच्च न्यायालयात याचिका
आता पर्यंत किती दंड वसूल केला माहिती देण्याची मागणी
पुणे: मास्क न घालणाऱ्या नागरिकांकडून राज्यातील महापालिका, नगरपालिकेकडून काही कोटींचा दंड घेण्यात आला आहे. या विरोधात उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. दंडात्मक कारवाई करतांना त्यात फेरबदल झाल्याचा दावा या याचिकेद्वारे करण्यात आला आहे.
वकील असीम सरोदे यांनी उच्च न्यायालयात याचीका दाखल केली आहे. दंडाच्या रकमेचे सरकार काय करणार आहे. पोलीस, महापालिका काय करणार याबाबत स्पष्टता नाही. कोणी काय कराव याबाबत नियमावली नाही. त्यामुळे सगळ्यांचे फावले आहे. त्यामुळे दंडात्मक कारवाई मधून जमा झालेली रक्कम सार्वजनिक स्वास्थासाठी वापरायला हवी अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली.
राज्यात मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात किती दंड वसूल झाला याची माहिती द्यावी अशी सुद्धा मागणी करण्यात आली. ज्यांच्याकडून दंड घेण्यात आले त्यांना फ्री मास्क दिले पाहिजे. तसेच गरिबीरेषेखाली जगणाऱ्या नागरिकांना सामाजिक न्याय विभागाकडून फ्री मास्क देण्यात यावे अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. मुकबधीर लोक ओठावरून कोण काय बोलत आहे ओळखतात. मास्क मुळे त्यांना फार मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. राज्यात १५ लाख मुकबधीर आहेत. सामाजिक न्याय विभागाकडून त्यांना वेगळ्या प्रकारचा मास्क द्यावा. केंद्रसरकार जमेल तेवढी माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. मिळविलेल्या माहितीचा काय उपयोग करून घेईल हे सांगता येत नसल्याचे सरोदे यांनी सांगितले.