Wednesday, September 28, 2022
Homeब-बातम्यांचाकोरोनाने माणसे मरतात ती जगण्याच्या लायकीची नसतात

कोरोनाने माणसे मरतात ती जगण्याच्या लायकीची नसतात

सांगली: दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यात दररोज हजारो कोरोना बाधित आढळून येत आहे. राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहे.  याच्या विरोधात सांगली जिल्ह्यात काढण्यात आलेल्या मोर्चात संभाजी भिडे हे सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी कोरोना हा आजार नाही. तो मानसिक रोग आहे. कोरोनाने माणसे मरतात ती जगण्याच्या लायकीची नसतात, असे वादग्रस्त विधान शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी केली.

संभाजी भिडे बोलताना म्हणाले की, मुळात कोरोना हा रोग नाही. आणि कोरोनाने जी माणसं मरतात ती जगायला लायक नाहीत. कोरोना हा रोगच नाहीए. हा गांडू वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे. मानसिक रोग आहे असे वादग्रस्त विधान केले.

या संदर्भात ते पुढे म्हणाले की, राज्य आणि केंद्र शासन लोकांना उल्लू बनवत आहे. त्यांना काहीच कळत नाही. मास्क लावायची गरज आहे का? एकीकडे दारू सुरु आहे, लोक गांजा ओढत आहे. अफू सुरु आहे, मग मास्कने काय होणार आहे. मुळात कोरोना अस्तित्वात आहे का, हा प्रश्न महत्वाचा आहे. लॉकडाऊनचा निर्णय घेणाऱ्या राज्य सरकारलाअजिबात अक्कल नाही.’

दरम्यान, हा मोर्चा भाजपच्या नियोजनात आज सांगलीतील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला होता. त्यात आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, माजी आमदार दिनकर पाटील, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, नगरसेवक शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, नगरसेवक शेखर माने आदी सहभागी झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments