लोकांनी मुख्यमंत्र्याचे ऐकले आहे. विरोधकांनी 1 मे पर्यंत घरीच बसावे – शिवसेना

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन केले तर जनता रस्त्यावर उतरेल असे विरोधी पक्ष ओरडत होता. सध्या असे काही घडताना दिसत नाही. लोकांनी मुख्यमंत्र्याचे ऐकले आहे. विरोधी पक्षाने 1 मे पर्यंत घरीच बसावे अशी टीका सामन्याच्या अग्रलेखातून विरोधकांवर करण्यात आली आहे.
राज्यात संचारबंदी करून दुसऱ्या लढाई विरोधात रणशिंग फुंकले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जनतेला विश्वासात घेवून या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यसाठी मागील सात ते आठ दिवस विचार विनिमय करण्यात येत होता. सरकारच्या मनात आले म्हणून मागचा पुढचा विचार न करता. लॉकडाऊन लादले असे झाले नाही. हे निर्बंध मी आनंदाने लावत नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. “परिस्थिती इतकी वाईट आहे की प्राण वाचविणे यालाच पहिले प्राधान्य द्यावे लागेल” मुख्यमंत्र्यांनी योग्य तेच सांगितले. परिस्थिती हाता बाहेर गेली आहे. बेड, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचा तुटवडा जवावा एवढा कोरोनाचां प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोनाची आणीबाणी फक्त महाराष्ट्रात आहे काय? संपूर्ण देश कोरोनाच्या जबड्यात अडकला आहे. महाराष्ट्र लपवाछपवी करून रुग्णाचा आकडा लपवत नाही. कारण खोटेपणा महाराष्ट्रात खोटेपणा रुजला नाही असे सामन्याचा अग्रलेखात नमूद केले आहे.
हरिद्वारच्या कुंभमेळ्याने कोरोनाचा अणुबॉम्ब फोडला आहे. कुंभमेळा सहभागी झालेल्या शेकडो साधू संत आणि गंगेत डुबकी मरणाऱ्यना कोरोना झाला आहे.
महाराष्ट्राने घेतले असे उतर राज्यांनी कोरोनाचे प्रकरण गांभीर्याने घेतले असे दिसून येत नाही. कोरोनाचा विषाणू भगवा की हिरवा अशा कोणत्याही धर्म, रंगाची पर्वा करत नाही.
महाराष्ट्रात निर्बंध सुरू करताना माणुसकीला प्राधान्य देण्यात आले आहे. लॉकडाऊन झाले तर गरिबांच्या चुली विझतील त्यांनी खायचे काय? हा प्रश्न आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 5 हजार 476 कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. रोजी थांबली तरीही रोटी थांबणार नाही. सरकार काळजी घेईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. लोकांना विश्वासात घेवून बंदची आखणी केली आहे. 7 कोटी लोकांना सरकार अक महिना मोफत गहू तांदूळ देणार आहे. शिवभोजन थाळी मोफत देणार आहे. मुख्यमंत्री यांनी आगडोंब उसळनार नाही याची काळजी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन केले तर लोक रस्त्यावर उतरतील असे विरोधी पक्ष ओरडत होता. असे काहीच घडताना दिसत नाही. लोकांनी मुख्यमंत्र्याचे ऐकले आहे. विरोधी पक्षांनी 1 मे पर्यंत घरीच बसावे अशी टीका सामन्यातून करण्यात आली आहे.