”शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली” ; भाजप नेत्याचं आक्षेपार्ह विधान

शिवाजी महाराज
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या एका वक्तव्यामुळे रणकंदन माजलं असतानाच भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय.

त्रिवेदी हे राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावर एका वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात आपली भूमिका मांडत होते. त्यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं.

”छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील पाचवेळा औरंगजेबाला पत्र लिहून औरंगजेबाची माफी मागितली होती. मग याचा अर्थ काय झाला? पण सावकरांनी ब्रिटीश संविधानाची शपथ तरी घेतली नव्हती.

छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पाच वेळा पत्रे लिहिली होती. त्या काळात अनेक लोक राजकीय संकटातून बाहेर पडण्यासाठी माफीनामा लिहीत असत”. असं त्रिवेदी म्हणाले.

त्रिवेदी यांचा चर्चा सत्रातील तो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्यांच्याविरोधात संतापाची लाट पाहायला मिळतेय. त्रिवेदी यांचा शिवप्रेमींकडून निषेध करण्यात येतोय.

राज्यपालांच्या वक्तव्यामुळे भाजपवर सडकून टीका झाली होत असतानाच त्रिवेदी यांच्या विधानामुळे विरोधकांनी भाजपला फैलावर घेतल्याचं दिसतंय.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *