”लोकं चुकीचा अर्थ काढत आहेत” ; सदावर्तेंनी केलं राज्यपालांचं समर्थन

गुणरत्न सदावर्ते
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं राज्यपालांवर सडकून टीका सुरु आहे.

राज्यपालांच्या वादग्रस्त विधानामुळे भाजपवरही विरोधक निशाणा साधत आहेत. तसंच राज्यपालांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करण्याची मागणी जोर धरू लागलीये.

दरम्यान, वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राज्यपालांचं समर्थन केलंय. काही पराभूत मनोवृत्तींचे लोकं राज्यापालांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढत आहेत,असं म्हणत सदावरतेंनी कोश्यारींची बाजू मांडली.

ते म्हणाले, “राज्यपालांच्या वक्तव्याचा काही पराभूत मनोवृत्तीचे लोकं चुकीचा अर्थ काढत आहेत. ते पराभूत मनोवृत्तीचे लोकं आहेत, त्यांची नावे घेण्याची गरज नाही. या लोकांनी त्यांचे भाषण व्यवस्थितपणे ऐकावं. त्यांचं भाषण हे तात्वीक आहे. राजकीय भूक भागवण्यसाठी त्यांच्याकडून टीका केली जात आहे”.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *