लोक कोरोनापेक्षा मोदी कृपेने आलेल्या तुटवड्यामुळे मरत आहेत : सचिन सावंत

नवी दिल्ली : देशात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक झाली असून दिवसाला ४ लाखांच्यावर कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. तर, अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण पडला असून आरोग्य सुविधा आता अपुऱ्या पडू लागल्या आहे. अशी भयानक परिस्थीती देशात असून यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प बसून आहेत. अशी टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी मोदी सरकारवर केली आहे.
कॉंग्रेस नेते सचिन सावंत म्हणाले की, ‘”जनतेला मदत जाहीर करावी लागेल म्हणून मोदी जींनी आतापर्यंत प्रतिदिनी ४ लाखांवर रुग्णसंख्या जाऊनही लॉकडाऊन जाहीर केला नाही गतवर्षी ५०००० रुग्णसंख्या असताना मोदींनी लॉकडाऊन जाहीर केला होता. देशात मोदी कृपेने ऑक्सिजन, रेमडेसीवीर, बेड, आरोग्य कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. लसीकरणाच्या पुरवठ्याची पूर्ण वाताहत झाली आहे. लोक कोरोनापेक्षा मोदी कृपेने आलेल्या या तुटवड्यामुळे मरत आहेत. कोरोनापेक्षा मोदी सरकारची बेपर्वाई व नियोजनशून्यता मारक ठरत आहे. असे असतानाही सर्वोच्च न्यायालयाने कानपिचक्या दिल्या तरी मोदी गप्प बसून आहेत. आतातर निवडणूक ही पार पडली.”
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. दिवसाला 4 लाख पेक्षा अधिक नवीन कोरोना रुग्णांची भर पडत आहे मात्र गतवर्षी 50 हजार रुग्णसंख्या असताना मोदिंनी लॉकडाऊन जाहीर केला होता. यावेळी जनतेला मदत जाहीर लागेल म्हणून त्यांनी देशात मोठ्या प्रमाणात रुग्ण मिळून सुद्धा लॉकडाऊन लावला नाही अशी टीका आज कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे. पुढे बोलताना देशात मोदी कृपेने ऑक्सिजन, रेमडेसीवीर, बेड, आरोग्य कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. लसीकरणाच्या पुरवठ्याची पूर्ण वाताहत झाली असून लोक कोरोनापेक्षा मोदी कृपेने आलेल्या या तुटवड्यामुळे मरत आहे. मोदी सरकारची बेपरवाई व नियोजनशून्यता मारक ठरत आहे. असा आरोप सचिन सावंत यांनी मोदी सरकारव लावला आहे.