पवार-शहा भेट झालीच नाही-जितेंद्र आव्हाड
मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात अहमदाबाद येथे गुप्त बैठक झाल्याचे बोलण्यात येत आहे. यानंतर देशातील राजकारणात अनेक हालचाली सुरु झाल्या आहे. याबाबत अमित शहा यांना पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्या सोबत गुप्त बैठक झाली का? असा प्रश्न विचारला असता शहा यांनी सगळ्या गोष्टी सार्वजनिक केल्या जात नाही अस सूचक वक्तव्य केल होत.
याप्रकरणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून शरद पवार-अमित शहा यांची भेट झाल्याचे नाकारले आहे. “पवार साहेब-अमित शहा भेट झाली नाही. ही काळ्या दगडावराची पांढरी रेघ आहे. तरी देखील आमचे काही पत्रकार मंडळी रंग उधळत आहेत. चघळायला काही नसले कि अफवेभवती दोन दिवस घालवता येतात. हेच या बातमीच्या रूपाने सिद्ध होतं. माझ्या सर्व पत्रकार बांधवांना होळीच्या शुभेच्छा! बुरा ना मानो होली है. असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
पवार साहेब-अमित शहा भेट झाली नाही. ही काळ्या दगडावराची पांढरी रेघ आहे. तरी देखिल आमचे काही पत्रकार मंडळी रंग उधळत आहेत.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 29, 2021
चघळायला काही नसले कि अफवेभवती दोन दिवस घालवता येतात. हेच या बातमीच्या रूपाने सिद्ध होतं.
माझ्या सर्व पत्रकार बांधवांना होळीच्या शुभेच्छा! बुरा ना मानो होली है.
शरद पवार-अमित शहा यांची गुप्त भेट झाल्याची चर्चा आहे. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून हे भेट झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. तर भाजपकडून याबाबतीत मौन पाळण्यात येत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार-अमित शहा यांची भेट झाली की नाही. हे माहित नाही असे सांगितले आहे.