Tuesday, October 4, 2022
HomeZP ते मंत्रालयपवार म्हणाले, सत्ता गमवावी लागली तरी बेहत्तर ; विद्यापीठ नामांतराचा किस्सा वाचा

पवार म्हणाले, सत्ता गमवावी लागली तरी बेहत्तर ; विद्यापीठ नामांतराचा किस्सा वाचा

आज औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचा ६४ वा वर्धापनदिन. आजच्याच दिवशी १९५८ ला विद्यापीठाची स्थापना झाली होती.

मात्र, खऱ्या अर्थाने विद्यापीठ चर्चेत आले ते नामांतर लढ्यामुळे. १४ जानेवारी १९९४ रोजी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असे नामांतर करण्यात येणार असल्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी सांगितले.

मात्र, त्यागोदरच १६ वर्षांपूर्वी औरंगाबाद विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचे ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मजूर झाले होते. २७ जुलै १९७८ला ठराव संमत झाले. मात्र, या निर्णयाला एका वर्गाने कडाडून विरोध केला. परिणामी हा निर्णय पुढे १६ वर्ष रेंगाळत राहिला.

१९७८ नंतर विद्यापीठ नामांतर मुद्द्यामुळे मराठवाड्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या लढ्यात अनेक लढ्यातअनेक युवक – युवतींना आपले प्राण गमवावे लागले.

दलितांवर अन्याय, अत्याचार झाले. काही भागात दलित व सवर्णांमध्ये दंगली झाल्या. यातून मराठा आणि दलितांमध्ये अंतर वाढले. मात्र, मुख्यमंत्री असलेल शरद पवार नामांतराच्या मुद्द्यावर ठाम राहिले.

नामांतरामुळे पवारांचे सरकार धोक्यात

जेंव्हा शरद पवारांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडून पुलोद सरकार स्थापन केले, तेंव्हापासूनच मराठवाड्यातील युवकांना शरद पवारांची भुरळ पडायला सुरुवात झाली. याच कारण म्हणजे, मराठवाड्यातील प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधातील असंतोष.

या असंतोषातून पवार नावाचा पर्याय मराठवाड्यातील तरुणांसमोर उभा टाकला. मराठवाड्यातील तरुणांचा पवारांना पाठींबा वाढू लागल्यानेच समाजवादी कॉंग्रेस पक्ष आपली पाळेमुळे अधिक घट्ट करू लागला.

पवारांच्या पाठीमाने उभारणाऱ्या मराठवाड्यातील तरुणांमध्ये मराठा समाजातील तरुणांचा पण मोठा समावेश होता. मात्र, मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या मुद्द्यामुळे सरंजामी मराठा तरुण वर्ग पवारांवर चांगलाच नाराज झाला. तरीही पवार आपल्या भूमिकेपासून मागे हटले नाहीत.

नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दावा केला की,

सरकारमधील काही मंत्र्यांनी त्यावेळी पवारांना सांगितले, नामांतराचा निर्णय घेतला तर तुम्हाला सत्ता सोडावी लागेल. यावर पवार म्हणाले, सत्ता गमवावी लागली तरी बेहत्तर, पण शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचारांचे चाक उलटे फिरू देणार नाही.

यावरून नामांतरावर पवार किती ठाम होते, याची प्रचीती येते

नामांतर लढा, दंगली आणि राष्ट्रपती राजवट

मराठवाडा विद्यापीठ नामांतर मुद्द्यावरून दंगली झाल्या. काही ठिकाणी दलितांना टार्गेट केले गेले. या सर्व अनागोंदीबाबत चर्चा करण्यासाठी पुढे १९८० मध्ये शरद पवार यांना तत्कालीन गृहमंत्री झैल सिंग यांनी बोलावले होते. त्यानुसार शरद पवार दिल्लीला गेले.

मात्र, झैल सिंग यांनी पवारांना सांगितले की, माझे तुमच्याशी काही काम नाही. पंतप्रधान इंदिरा गांधींना भेटा. झैल सिंग यांच्या म्हणण्यानुसार पवार इंदिरा गांधींना भेटीला गेले.

पवारांची इंदिरा गांधींसोबत चर्चा

इंदिरा गांधी एकदम बेदरकर होत्या. कॉंग्रेसचे भलेभले नेते त्यांच्यासमोर मान वर करायची हिम्मत करत नव्हते. त्यांच्याशी बोलताना बोबडी वळायची. पण पवार भेटायला गले तेव्हा इंदिरांनी पवारांचे कौतुक केले.

त्यांनी ज्या पद्धतीने कॉंग्रेसमधून बाहेर पडत आघाडी सरकार स्थापन करून चालविले, यावर इंदिरांनी बोलणे सुरु केले. त्यानंतर आम्ही कितीदिवस जबाबदारी उचलायची? तुम्ही युवकांनी एकत्र येऊन देशाचे भवितव्य घडविण्याची गरज असल्याचे म्हटले. एकंदरीत इंदिरांच म्हणणे होते की, पवारांनी कॉंग्रेसमध्ये परतून राजीव गांधी यांच्यासोबत काम करावे.

‘आपको संजय के साथ काम करना है’, असेही त्या म्हणाल्या. पण इंदिराजींच्या खेळीला बळी पडतील ते पवार कसले ? चाणाक्ष पवारांनी इंदिराजींच्या बोलण्याला ‘हसते-हसते’ घेत मूळ मुद्द्याला बगल दिली. त्यानंतर दोघांमधली चर्चा संपली.

पुलोद सरकार बरखास्त

त्याकाळात इंदिराजींचा प्रस्ताव नाकारून त्यांची नाराजी ओढवून घेणे म्हणजे, घोडचूक मानली जायची. पण पवारांनी तेच केले. इंदिराजीं सोबतची बैठक आटोपून पवार मुंबई विमानतळावर आले. विमानातून उतरले तोच राज्याचे मुख्य सचिव धावत येताना दिसले. धावत येऊन मुख्य सचिव म्हणाले,

‘आपले सरकार बरखास्त झाले. महाराष्ट्रात पहिली राष्ट्रपती राजवट लागली आहे.’

तो दिवस होता, १७ फेब्रुवारी १९८०. पवार इंदिराजींना भेटून ४८ तासही झाले नव्हते. ते दिल्लीवरून मुंबईला परतत होते तोवर इंदिराजींना पुलोद सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू केली होती.

अधिक वाचा :

मुंबईत उतरल्यावर पवारांना कळलं, ‘पुलोद’ सरकार गेलं, राष्ट्रपती राजवट लागली…

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments