Tuesday, October 4, 2022
Homeब-बातम्यांचाशालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पितृशोक

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पितृशोक

मुंबई : काँग्रेसचे मुंबईचे माजी शहरध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचं कोरोनाची लागण झाल्यामुळे निधन झालं आहे. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील होते.
एकनाथ गायकवाड यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे उपचारासाठी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान आज सकाळी १० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
एकनाथ गायकवाड यांनी मुंबईतील धारावी भागात काँग्रेस पक्षासाठी मोठे काम केले होते. त्यांनी मुंबई शहर अध्यक्षपदही भूषवले होते. लोकसभा निवडणुकीत एकनाथ गायकवाड यांनी शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांचा पराभव केला होता. २ वेळा ते खासदार म्हणून निवडून आले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून सेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी त्यांचा पराभव केला होता.
त्यानंतरही ते काँग्रेसमध्ये सक्रीय होते. जुलै २०१९ मध्ये मुंबई काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या कन्या वर्षा गायकवाड यांची महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदावर वर्णी लागली. वर्षा गायकवाड यांच्याकडे शालेय शिक्षण खाते आहे.
एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे काँग्रेसवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दुख व्यक्त केले आहे.

राजकीय कारकीर्द
एकनाथ गायकवाड हे काँग्रेसचे मुंबईचे माजी शहराध्यक्ष होते. राज्य मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपद भूषविलं होतं. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख होती. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती होती. साधी राहणीमान असलेले गायकवाड विक्रोळीत राहत होते. मात्र, त्यांनी धारावीवर आपली पकड ठेवली होती. धारावीतील प्रत्येक चाळीतील लोकांना ते नावाने ओळखत होते. गायकवाड हे काँग्रेसमधील असले तरी दलित चळवळीशी त्यांचं नातं होतं. दलित चळवळीतील कार्यकर्तेही त्यांना मानत होते. सर्वच रिपब्लिकन नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात ते हिरहिरीने भाग घेत होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments