|

पार्थ पवारांचं अर्थसंकल्पावर ट्विट

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई: राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा २०२१-२२ वर्षाचा अर्थसंकल्प मांडला. महाविकासआघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प ठरला. या राज्यातून संमिश्र प्रतिक्रिया उमटलेल्या पहायला मिळत आहेत. राज्यातील सर्वच घटकांना खूश करण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात करण्यात आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी वडिलांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे.

कोरोनाच्या वैश्विक संकटामुळे ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीचं चित्र या अर्थसंकल्पावर उमटलं आहे. तरीही अर्थसंकल्पात आरोग्य,  कृषी, महिला सबलीकरण अशा सगळ्या मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे. हाच धागा पकडत पार्थ पवार यांनी अर्थसंकल्पावर एक ट्वीट केलं आहे. “राज्याच्या बजेटवर कोरोना महामारीचा परिणाम झाला असतानाही अर्थसंकल्पात विकासाच्या सर्वच गोष्टींना प्राधान्यक्रम देण्यात आली, ही उल्लेखनीय बाब आहे. या अर्थसंकल्पाचा सर्वसामान्य जनतेला लाभ होईल”, अशी प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाचा सर्वसामान्य जनतेला लाभ होईल अशी अपेक्षा पार्थ पवार यांनी व्यक्त केलीये.

सोमवारी महाविकास आघाडी सरकारकडून विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात दुपारी दोन वाजता बजेटचे वाचन सुरु केले.अजित पवारांनी २००९ ते २०१४ पर्यंत एकूण ४ अर्थसंकल्प मांडलेले आहेत. याबरोबर जयंत पाटील, सुनील तटकरे यांनी देखील अर्थसंकल्प मांडले आहेत.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *