परमबीर सिंह हे विरोधकांचे ‘डार्लिंग’
मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रानंतर राजकारण ढवळून निघाल आहे. विरोधकांकडून आता गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. या सर्व प्रकरणात सामनाच्या अग्रलेखातून परमबीर सिंह यांच्यावर टिका करण्यात आली आहे.
अग्रलेखात परमबीर सिंह यांनी पत्र लिहून सरकारला आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. त्याच बरोबर परमबीर सिंह हे अगदी बेभरवशाचे अधिकारी आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही असे भारतीय जनता पक्षाचे मत काल पर्यंत होते, पण तेच भाजप आज डोक्यावर घेऊन नाचत आहे. “सचिन वाझे यांना हटवून काय फायदा? पोलीस आयुक्तांना हटवा” अशीच मागणी भाजपच्या वतीने करण्यात येत होती. आता त्याच परमबीर सिंह यांना खांद्यावर घेऊन भाजपवाले लग्नाच्या वरातीत नाचावे तसे भेभान होऊन नाचावे असे नाचत आहे. हा राजकीय विरोधाभास आहे.
सुशांत सिंग, कंगना राणावत प्रकरणात त्यांनी चांगला तपास केला. हे जरी खरे असले तरीही पोलीस अधिकाऱ्याने असे पत्र लिहून सरकारला आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य नसल्याचे टिका केली आहे. परमबीर सिंह यांना थोडा संयम ठेवायला हवा होता. पुन्हा सरकारला अडचणीत आणण्यासाठी परमबीर सिंह यांचा कोणी उपयोग करत नाही ना? ही शंका आहे. ज्या वाझे यांच्यामुळे हे सराव वादळ उठले, त्या वाझे यांना इतके अमर्याद अधिकार कोणी दिले? सचिन वाझे यांनी बरेच उपदव्याप केले. ते वेळीच थांबविले असते तर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची शान राहिली असती.
परमबीर सिंह यांच्या निलंबनाची मागणी काल पर्यंत विरोधी पक्ष करत होता. आज परमबीर सिंह हे विरोधकांचे डार्लिंग झाले आहे अशी टिका अग्रलेखातून करण्यात आली आहे.