पंकजा मुंडे यांचे आरोग्य मंत्र्यांना पत्र; धनंजय मुंडे यांच्यावर टीका

बीड: राज्यातील कोरोना बाधितांचि संख्या झपाट्याने वाढत असून औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. प्रत्येक जिल्ह्यात हीच परिस्थिती पाहायला मिळाली आहे. कोरोना रुग्णाला लागणारे रेमडीसिविर इंजेक्शनचां प्रचंड तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभमीवर भाजपच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिले आहे. बीड जिल्हा कडे लक्ष देण्याची विनंती केली आहे. पंकजा मुंडे यांनी हे पत्र ट्विट करून धनंजय मुंडे यांचे नाव न घेता बोचरी टीका केली आहे.
पंकजा मुंडे यांनी ट्विट केलेल्या पत्रात बीड जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना सांगितली आहे. “बीड जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. परिस्थिती गंभीर आहे. आता पर्यंत ७२९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३४ हजार ९८९ लोक बाधित झाले आहेत. आरोग्य यंत्रणा आहोरात्र काम जरी करत असली रेमडीसिविर इंजेक्शनचां तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांचा नातेवाईकांना मोठा मनस्ताप होत आहे. पुरेशी लस नसल्याने लसीकरण केंद्र बंद पडत आहेत. या साऱ्याकडे आपण जातीने लक्ष घालावे आणि रेमडीसिविर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे. अशी विनंती पंकजा मुंडे यांनी केली.
राज्याला २ लाख लसीचे डोस मिळाले आहेत. त्यातील बीड जिल्हाला केवळ २० डोस मिळाले आहेत. इतर जिल्ह्याच्या तुलनेत ही संख्या खूप कमी आहे.हे अतिशय खेदकारक आहे. त्यामुळे त्याकडे गांभीर्याने लक्ष देवून लसीचे डोस उपलब्ध करून द्यावे अशी मागणी सुद्धा पंकजा मुंडे यांनी केली. बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहित आहे. जनतेच्या हितासाठी लढण्यासाठी आम्ही तयार आहोत.अस म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता बोचरी टीका केली आहे.
#REMDESIVIR चा तुटवडा बीडमध्ये जाणवत आहे, आरोग्य मंत्री यांना विनंती आहे जातीने लक्ष घालून उपलब्ध करून द्यावे. राज्य सरकारला आलेल्या 2 लाख पैकी बीड ला ही पुरेसे #vaccine मिळाले पाहिजेत. बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत. pic.twitter.com/30Bi8lu7mj
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) April 15, 2021