Friday, October 7, 2022
Homeब-बातम्यांचापंढरपूर पोटनिवडणूक तोंडावर,उमेदवारीबाबत संभ्रम !

पंढरपूर पोटनिवडणूक तोंडावर,उमेदवारीबाबत संभ्रम !

मुंबई : पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम आयोगानं जाहीर केला असून १७ एप्रिल २०२१ रोजी मतदान होणार असून २ मे ला मतमोजणी होणार आहे. यासंदर्भात २३ मार्चला नोटिफिकेशन जारी होणार असून. २३ मार्च ते ३०  मार्च दरम्यान अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असणारे यावेळी उमेदवारांना आपला अर्ज दाखल करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ३१ मार्चला या अर्जाची छाननी केली जाईल तसेच ३ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमात दिली गेली आहे. विधानसभा पोटनिवडणुकीचं मतदान १७ एप्रिल रोजी तर मतमोजणी २ मे २०२१ ला पार पडणार आहे.

पंढरपूर – मांगळवेढा विधानसभा निवडणूक नेहमीच चर्चेत राहिली. २००९ रोजी मतदारसंघ पुनर्रचनेत बदल झाला आणि २००९ च्या निवडणुकीत तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करून अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेले भारत भालके ‘जायंट किलर’ ठरले. पुढे २०१४ मध्ये भालके यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवून सध्याचे विधान परिषद सदस्य असलेले प्रशांत परिचारक यांचा पराभव केला. मोदी लाटेतही भालके  विजयी झाले होते. ऑक्टोबर २०१९ मध्ये भालके  यांनी काँग्रेसऐवजी राष्ट्रवादीचा पर्याय स्वीकारला. भाजपने तेव्हा सुधाकरपंत परिचारक या जुन्या जाणत्या नेत्याला रिंगणात उतरवले होते, पण भालके यांनी हॅटट्रिक केली होती. तीन निवडणुकांमध्ये तीन वेगवेगळ्या पक्षांकडून निवडून येण्याचा विक्रम भालके  यांनी केला होता. विरोधकांच्या मताचे विभाजन करणे आणि सामान्य मतदारांशी असलेली नाळ यामुळे भालके विजयी होत गेले. मात्र त्यांच्या अकाली निधनाने रिक्त जागेवर निवडणूक जाहीर झाली.

पंढरपूर-मंगळवेढा या मतदारसंघासाठी भाजप पदाधिकऱ्यांनी नुकतीच एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत  पोटनिवडणूक बिनविरोध न होऊ देता,  उमेदवार देण्याची घोषणा भाजपच्या वतीने करण्यात आली होती. पंढरपूर -मंगळवेढा या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आमदार प्रशांत परिचारक यांचे पुतणे प्रणव परिचारक यांच्या नावाची चर्चा होत होती.

पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असला तरी उमेदवारीबाबत राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये संभ्रम आहे. सलग तीन वेळा निवडून आलेल्या भालके यांच्या परिवारातील सदस्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणी होत आहे. त्याच वेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक औदुंबर ऊर्फ  अण्णा पाटील यांचे नातू युवराज पाटील यांनी राष्ट्रवादीतच विरोधी सूर लावला आहे. दुसरीकडे विधान परिषदेतील भाजपप्रणीत आमदार प्रशांत परिचारक यांनी अद्यापही भूमिका जाहीर के लेली नाही. शिवसेनेचे आणि सलग दोन वेळा निवडणूक लढलेले समाधान आवताडे पुन्हा उतरण्याच्या तयारीत आहेत. तसेच सेनेंकडून गेल्या निवडणुकीत माघार घेतलेल्या शैला गोडसे यादेखील इच्छुक आहेत.

दरम्यान निवडणुकीसाठी अनेक नेत्यांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली असल्याचे समोर आले आहे. समाधान आवतडे यांनी काढलेली ‘सुसंवाद यात्रा’ काढली तर भगीरथ भालके यांनी नुकतीच काढलेली ‘जनसंवाद यात्रा’ तर दुसऱ्या बाजूला, अभिजीत पाटील यांच्याकडून सुरू झालेल्या क्रीडा स्पर्धा, तसंच विविध सामाजिक उपक्रम या सर्व माध्यमातून या नेतेमंडळींची जनतेच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू असल्याचे बोलले जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments