|

पंढरपूर पोटनिवडणूक बिनविरोध होणार? जयंत पाटलांच्या वक्तव्यानंतर संभ्रम !

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

पंढरपूर:  पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर १७ एप्रिला पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादीच्या वतीने पोटनिवडणुकीसाठी भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. त्याविरोधात भाजपने समाधान आवताडे यांना रिंगणात उतरवलं आहे. दोन्ही उमेदवारांचे अर्ज आज दाखल करण्यात आले. त्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दोघेही आज पंढरपुरात उपस्थित होते.

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पंढपूर येथे  झाला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मेळाव्याला संबोधित केलं. चंद्रकांत पाटील म्हणतात आम्ही शेतकाऱ्यांच्या प्रश्नावर निवडणूक लढवतोय. वारे रे वा. कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु असताना तुम्ही शेतकऱ्यांचं हित करणार म्हणता? असा सवाल जयंत पाटलांनी विचारला. तसंच निवडणुका झाल्यानंतर पंढरपूर मतदारसंघातील प्रश्न घेऊन अजितदादांसोबत बसू, सर्व प्रश्न मार्गी लागतील, असंही जयंत पाटील म्हणाले.

महाविकास आघाडीच्या सर्व घटकांचा भगीरथांना आशीर्वाद आहे. जेव्हापासून महाविकास आघाडी आली आहे, भाजपचा कुठेही विजय झालेला नाही. सगळे एकत्र आल्यावर भाजपचा पराभव होतो ही काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणूनच काहींनी भाजपची उमेदवारी घेतली नाही. फडणवीसांनी उमेदवार देणार नाही असं सांगितलं होतं. आपण तीन तारखेपर्यंत वाट पाहू. फडणवीसांवर आताच अविश्वास दाखवणं योग्य होणार नाही, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

काय म्हणाले जयंत पाटील

जयंत पाटील म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवार देणार नाही असं सांगितलं होतं. आपण तीन तारखेपर्यंत वाट पाहू. फडणवीसांवर आताच अविश्वास दाखवणं योग्य होणार नाही.”

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक

  • १७ एप्रिलला मतदान, २ मे रोजी गुलाल!
  • अर्ज भरण्यास सुरुवात – २३ मार्च २०२१
  • अर्ज भरण्याची अंतिम तारीख – ३० मार्च २०२१
  • अर्जांची छाननी – ३१ मार्च २०२१
  • अर्ज मागे घेण्याची तारीख – ३ एप्रिल २०२१
  • मतदान – १७ एप्रिल २०२१
  • निवडणूक निकाल – २ मे २०२१

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *