पंढरपूर पोटनिवडणूक निकाल : भाजपचे समाधान अवताडे यांची आघाडी

पंढरपूर : सर्वांचे लक्ष आज पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीच्या निकालावर लागूण आहे. देशातील पाच राज्यांच्या निवडणूकांचा आज निकाल आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रमध्येसुध्दा पंढरपूरयेथील पोटनिवडूकीचा निकाल आहे. येथील मतमोजणी सकाळी 8 वाजल्यापासून चालू झाली असून सातव्या फेरीमध्ये राष्ट्रवादीचे भगीरथ भालके आघाडीवर 1000 मतांनी आघाडीवर होते मात्र आठव्या फेरीपासून चित्र बदलले असून भाजपचे समाधान अवतडे यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे महाविकासआघाडीचे भगीरथ भालके व भाजपचे समाधान अवताडे यांच्यात तुरशीची लढाई पहावयास मिळत आहे. दरम्यान दुपारर्यंत या पोटनिवडणुकीचा निकाल हाती येण्याची शक्यता आहे. ही निवडणुक पंढरपूर-मंगळवेढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे घेण्यात आली आहे.
दरम्यान समाधान अवताडे यांना एकोविसाव्या फेरीअखेर 901 मतांनी आघाडी घेतली आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत एकूण ३ लाख ४० हजार ८८९ मतदार असून 17 एप्रिल रोजी एकूण ५२४ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली होती.