Saturday, October 1, 2022
Homeब-बातम्यांचापंढरपूर पोटनिवडणूक निकाल : राष्ट्रपती ते नगरसेवक निवडणूकांत भाग घेणाऱ्या अभिजित बिचुकलेस...

पंढरपूर पोटनिवडणूक निकाल : राष्ट्रपती ते नगरसेवक निवडणूकांत भाग घेणाऱ्या अभिजित बिचुकलेस मिळाली ‘एवढी’ मते

पंढरपूर : राज्यातील पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालावर सर्वांचे लक्ष आहे. ही निवडणूक पंढरपूर-मंगळवेढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे घेण्यात आली आहे. दरम्यान या निवडणुकीत साताऱ्याचे अभिजित बिचुकले यांनी सुद्धा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. यामध्ये आतापर्यंत अभिजित बिचुकले यांना 23 व्या फेरी अखेर 66 मते मिळाली आहे. कोरोना काळातही ही निवडणूक घेण्यात आली असून यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करुन राजकीय पक्षांनी सभा घेतल्या आहेत.

अभिजित बिचुकले यांनी आतापर्यंत अनेक निवडणुकात भाग घेतला असून ते स्व:ला कवी मनाचा नेता म्हणून म्हणवून घेतात तेव्हा या नेत्याने साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना सुद्धा अनेक वेळा आव्हान दिले असून देशाच्या राष्ट्रपतीपासून ते नगरसेवापर्यंत अनेक निवडणुकांत त्यांनी सहभाग घेतला आहे. २०१९ मध्ये आदित्य ठाकरे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र आतापर्यंत अभिजित बिचुकले यांना कोणत्याच पोटनिवडणुकीत विजय मिळाली नाही. त्यामुळे त्यांचे हे स्वप्न पंढरपूर पोटनिवडणुकीत साकार होणार हे बघावे लागणार आहे. प्रसिद्ध ‘बिग बॉस’ शोमध्ये अभिजित बिचुकले यांनी सहभाग घेतला होता.

अनामत रक्कम म्हणून १२ हजार ५०० रुपयांची चिल्लर लोकसभा निवडणुकीत उमेदवारीचा अर्ज भरताना जिल्हाधिकाऱ्यांकडे अभिजित बिचुकले यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. तेव्हा याप्रकरणाची मोठी चर्चा झाली होती.

पंढरपू रयेथील पोटनिवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ वाजल्यापासून चालू झाली असून सातव्या फेरीमध्ये राष्ट्रवादीचे भगीरथ भालके १ हजार मतांनी आघाडीवर होते मात्र आठव्या फेरीपासून चित्र बदलले असून भाजपचे समाधान अवतडे यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे महाविकासआघाडीचे भगीरथ भालके व भाजपचे समाधान अवताडे यांच्यात चुरशीची लढाई पहावयास मिळत आहे. दरम्यान दुपारर्यंत या पोटनिवडणुकीचा निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

दरम्यान समाधान अवताडे यांना ३२ व्या फेरीअखेर २४ हजार मतांनी आघाडी घेतली आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत एकूण ३ लाख ४० हजार ८८९ मतदार असून १७ एप्रिल रोजी एकूण ५२४ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments