|

पंढरपूर पोटनिवडणुक; राष्ट्रवादी काँग्रेसमोर भाजपच्या समाधान आवताडेंचं आव्हान!

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

पंढरपूर: पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे नेते तथा दिवगंत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झाल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. मतदारसंघात चांगलीच चुरस पहायला मिळत आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून समाधान महादेव आवताडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात येणार असल्याची चर्चा होती.

मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं अखेर आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. यापूर्वी याच मतदारसंघातून दोनदा निवडणूक लढताना प्रतिस्पर्धी उमेदवारांना कडवी टक्कर देणारे समाधान आवताडे यांना भाजपनं रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेससमोर आव्हान उभं राहिलं असून आता राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला मैदानात उतरवणार याविषयी प्रचंड उत्सुकता आहे.

समाधान महादेव आवताडे यांचा अर्ज भरण्यासाठी दिग्गज नेते उपस्थित राहून शक्तिप्रदर्शन करणार आहेत. उद्या (मंगळवार ३० मार्च) उमेदवारी अर्ज भरला जाईल. त्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार प्रशांत परिचारक तसेच जिल्ह्यातील भाजपचे नेते आणि पदाधिकारी उद्या सकाळी उपस्थित राहणार आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर विधानसभेची ही पहिलीच पोटनिवडणूक असल्यानं सत्ताधारी व विरोधकांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. सध्या या मतदारसंघात शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष शैला गोडसे यांनी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सचिन पाटील यांनी बंडखोरी केलेली आहे. त्यामुळं राष्ट्रवादीची डोकेदुखी अधिकच वाढली आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर भाजपनं पंढरपूरमध्ये प्रभावी असलेल्या परिचारक गटाची मनधरणी करून समाधान आवताडे यांना मैदानात उतरवलं आहे.

समाधान आवताडे यांनी २०१४ मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आवताडे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होते. आवताडे हे दामाजी सहकारी कारखान्याचे चेअरमन आहेत. मंगळवेढा पंढरपूर पोटनिवडणुकीतही अपक्ष उतरण्याची त्यांनी तयारी केली होती

आमदार परिचारक गटाने पाठिंबा दिल्याने समाधान आवताडे यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली असल्याचं म्हटलं जातंय.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *