शरद पवार यांचं बोम्मई यांना २४तासांचं अल्टीमेटम,हल्ले थांबवा अन्यथा…
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून चिथावणीखोर वक्तव्ये होत असल्याने सीमावाद उफाळून आला आहे. आज कर्नाटकात महाराष्ट्रातल्या गाड्यांवर हल्ले करण्यात आल्याने महाराष्ट्रातील संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. येत्या २४तासात कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्राच्या तसेच मराठी भाषिक जनतेवर हल्ले करणं थांबवण्यात आलं नाही तर परिस्थिती चिघळू शकते. महाराष्ट्रातील जनतेच्या संयमाचा बांध फुटला तर त्याला सर्वस्वी केंद्र…