| |

सांगलीत महाविकास आघाडीचा महापौर, उपमहापौर

सांगली: सांगली जिल्ह्यात महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक लढवण्यात आली. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून भाजपला मोठ्या पराजयाला सामोरे जावे लागले आहे. प्रसंगी सांगली पालिकेत महापौरपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. तसेच कॉंग्रेसच्या उमेदवाराची उपमहापौर पदी निवड झाली आहे. पालिकेत सत्ताधारी भाजपला एक मोठा धक्का बसला आहे. तसेच पक्षाने हातातील सत्ता गमावली आहे.महापौरपदी कॉंग्रेस-राष्टवादीचे आघाडीचे…

| |

शेवटी संजय राठोड आज सर्वांसमोर येणार

यवतमाळ: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यामुळे अडचणीत आलेले आणि बऱ्याच दिवसांपासून नॉट रीचेबल असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड आज अखेर सर्व माध्यमांसमोर येणार आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव चर्चेत असून त्यांच्या विरोधात विरोधी पक्ष आक्रमक आहे. गेले १५ दिवस ते गायब होते. तेव्हा आज पोहरादेवी संस्थानाला येऊन ते शक्तीप्रदर्शन करतील…

| |

राजेश टोपेंनी पत्राद्वारे केले जनतेला आव्हान

मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच कोरोनाचे रुग्ण देखील दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे, बच्चू कडू आणि आज छगन भुजबळ असे लोकप्रतिनिधी नेते यांना कोरोनाची लागण झाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या साथरोगाने पुन्हा उच्चांक गाठला आहे. अश्यातच, राजेश टोपे यांनी रुग्णालयातून जनतेला उद्देशून पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे  कोरोना संबंधित…

|

भिडे गुरुजींकडून काही धारकरी अवैध काम करून घेतात: नितीन चौघुले

सांगली: शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान या संघटनेत फुट पडली आहे. काही दिवसांपूर्वी या संघटनेतून नितीन चौघुले यांचे निलंबन करण्यात आले आहे. ”भिडे गुरुजींचे नाव घेवून काही धारकरी अवैध धंदे करतात, असा गंभीर आरोप नितीन यांनी केला आहे. दरम्यान, तडीपार वाळू तस्कर, लाॅटरी वाले गुरुजीना घेवून अधिकाऱ्याकडे घेवून जातात व अवैध कामे मंजूर करून घेतात, असा आरोप नितीन…

| |

भीमा कोरेगाव प्रकरणातील कवी-कार्यकर्ते वरवरा राव यांचा जामीन मंजूर

मुंबई: कोरेगाव-भीमा प्रकरणात दोन वर्षांपासून तुरूंगात असलेले ८२ वर्षीय कवि-कार्यकर्ते वरवरा राव यांना आज वैद्यकीय कारणास्तव मुंबई उच्च न्यायालयाने सहा महिन्यांचा जामीन मंजूर केला. त्यांच्यावर सध्या मुंबईच्या नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तेथे उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर महाराष्ट्र सरकारने त्यांना दाखल केले आहे. श्री. राव यांना कोर्टाने मुंबईतच राहावे व आवश्यकतेनुसार तपासासाठी उपलब्ध रहाण्यास सांगितले आहे….

| |

वनमंत्री संजय राठोड उद्या पोहरादेवीला येणार?

नागपूर: पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणी संशयित असलेले वनमंत्री संजय राठोड हे बऱ्याच दिवसांपासून माध्यमांसमोर आलेले नाहीत. गेल्या १४ दिवसांपासून पूर्णपणे अलिप्त असलेले संजय राठोड हे उद्या मात्र पोहरादेविला येणार असल्याची माहिती देवस्थानांच्या महंतांनी दिली आहे. दरम्यान, समर्थकांकडून स्वागताची जोरदार तयारी सुरु झाली आहे. या संदर्भात व्हॉट्सअॅप ग्रुप सक्रीय झालेले आहे. “चलो पोहरादेवी चलो पोहरादेवी” असे…

|

युवासेनेचा पोस्टरमधून सवाल, क्या यही है अच्छे दिन?

मुंबई: देश भरात पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात आंदोलन केली जात आहे. मुंबईत सुद्धा युवासेनेने पोस्टरबाजी करत केंद्रातील मोदी सरकार वर निशाणा साधला आहे. सततच्या दरवाढीमुळे सामान्य जनतेचा संताप वाढला आहे. वाढत्या पेट्रोल दरा विरोधात युवासेनेकेडून भाजप आमदार आणि आशिष शेलार यांचा मतदार संघाने जोरदार पोस्टरबाजी केली आहे. युवासेनेकडून वांद्रे पश्चिम मतदारसंघात…

|

जेंव्हा धीरूभाई गडकरींना म्हणाले, “मी हरलो, तू जिंकला!”

देशाचे दळणवळण मंत्री नितीन गडकरी हे प्रभावी स्पष्टवक्ते आहेत. एका वेब संवादाच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या आयुष्यातील महत्वपूर्ण रंजक आठवणींचा उलगडा केला आहे. तर घटना होती १९९७-९८ ची, गडकरी राज्याचे बांधकाम मंत्री होते. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे च्या बांधकामाचे नियोजन आखण्यासाठी धीरूभाई अंबानींनी नितीन गडकरी यांना घरी निमंत्रित केले होते. या प्रकल्पावर धीरूभाई अंबानी आणि गडकरी यांच्यात…

|

सलग बाराव्या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ

पुणे: बऱ्याच दिवसांपासून वाढत असलेल्या पेट्रोल आणि डीझेल च्या किमतीमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. अश्यातच, पेट्रोलियम कपन्यांनी आज शनिवारी सलग १२ व्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. या दरवाढीने मुंबईत पेट्रोल मध्ये ३७ पैश्यांची वाढ झाली आहे. तर डिझेल हि ३९ पैश्यानी महागल आहे. मुंबईत आज पेट्रोल ९६.९४ रुपये आहे. तर डीझेल…

| |

कोरोनाचे नियम पाळण्यात ‘आमचे चुकतंय’: या राज्यमंत्र्याची कबुली

पुणे: कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंपदामंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू यांना नुकतीच कोरोनाची लागण झाली आहे. अनेक मंत्री, राजकीय कार्यकर्ते मेळावे घेत आहेत. त्यात नियमाची पायमल्ली होत आहे. याबाबत राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी प्रांजळ कबुली दिली आहे. कोरोनाचे नियम पाळण्यात ‘आमचे चुकतंय’ अशी कबुली दिली आहे. दुर्दैवाने आम्ही सोशिअल डीस्टन्सिंगचे…

| |

कोरोनाच्या लढाईत मास्क हीच ढाल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुणे: आता कोरोनासोबत युद्ध सुरु आहे. या युद्धात मास्क हीच आपली ढाल आहे. महाराजांच्या काळातील युद्ध करावे लागत नसले तरी कोरोनाशी आपले युद्ध सुरु आहे. यासाठी ढाल म्हणजे मास्क असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शिवजयंतीनिम्मित राज्य सरकारकडून शिवनेरी किल्यावर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, छत्रपती…

| |

राजे, जेजुरीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत योग्य निर्णय घ्या…

पुणे: जेजूरी गडावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण १३ फ्रेब्रुवारीला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार छत्रपती संभाजीराजे हे अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत. परंतु, तत्पूर्वीच या पुतळ्याचे उद्घाटन आमदार गोपीचंद पडळकर व युवकांनी आज पहाटे केले. या पार्श्वभूमीवर होळकर घराण्याचे युवराज भूषणसिंहराजे होळकर यांनी छत्रपती संभाजीराजे यांना पत्र लिहिले असून…

| |

“जब-जब राजनीति लड़खड़ाती हैं तब उसे साहित्यही संभालता हैं”

राजकारण व साहित्याचा संबंध तसा इतिहासा पासूनच आहे. साहित्य मध्ये ‘राजनीतिक काव्यधारा’ ही एक वेगळीच शाखा निर्माण झाली होती. एकंदरीत राजकीय साहित्य विषयी बोलताना राष्ट्र कवी रामधारी सिंह दिनकर यांचा दाखला देणे खूप महत्त्वाचं ठरतं. कारण साहित्यिक इतिहासातील रामधारी सिंह हे खूप मोठे राष्ट्रकवि होऊन गेले. त्यांना सर्वप्रथम ‘राष्ट्रकवी’ म्हणून हाक मारणारे पंडित जवाहरलाल नेहरू…

| |

संपूर्ण जगातल्या महिलांना मताधिकार प्राप्त करून देणारी ‘सुफ्रिजेट चळवळीचे’ योगदान…

एकोणविसाव्या शतकाच्या अगोदर स्त्रियांच्या मतदानाचा अधिकार याविषयी पुरुषप्रधान समाजाची मते ही नकारात्मकच होती. सुफ्रिजेट (suffragette )या चळवळीचा बद्दल तुम्ही ऐकलं असेल. याचाच अर्थ ‘Right to vote’. युरोप आणि अमेरिकेमध्ये सुद्धा महिलांना मतदान करण्याचा अधिकार नव्हता. हळूहळू या बाबतीत लढा सुरू झाला. या चळवळीला आपण वुमन्स सुफ्रीजेट मुमेंट म्हणून ओळखतो. ‘पहिल्या जागतिक युद्धाच्या दरम्यान स्थानिक पुरुष…

| |

जेंव्हा एका ‘गझल’ मुळे इंदिरा-सरकार विचलित झाले होते…

दुष्यंत कुमार त्यागी हे आधुनिक हिंदी साहित्याचे भारतीय कवी होऊन गेले. विसाव्या शतकातील हिंदी कवी व गझलकार म्हणून ते प्रचंड लोकप्रिय होते. त्यांचा जन्म २७ सप्टेंबर १९३१ चा. मुरादाबाद मधून त्यांनी बीएड शिक्षण पूर्ण करून १९५८ मध्ये दिल्लीमधील आकाशवाणीला नोकरीस लागले. आणीबाणी च्या काळातली जुलूमशाही पाहून त्यांचा सरकारप्रति आक्रोश, राग त्यांच्या गझल आणि कविते मधून…

|

तब्बल १० वर्षाच्या लढ्यानंतर विद्यापीठाला मिळाले सावित्रीमाईंचे नाव, आज ७२ वा वर्धापन दिन

पुणे: स्त्रीशिक्षणासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या सावित्रीबाई फुलेंचे नाव पुणे विद्यापीठाला द्यावे यासाठी तब्बल १० वर्षे लढा द्यावा लागला. १० वर्षाच्या संघर्षानंतर भारतीय पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांचे नाव पुणे विद्यापीठाला देण्यात आले. पुणे विद्यापीठाचा नामविस्तार व्हावा यासाठी २००४ साला पासून नामांतर समिती आणि विविध पक्षांनी मागणी केली होती. पुणे विद्यापीठाचे नाव सावित्रीबाई फुले पुणे…

|

जेंव्हा महिला पत्रकाराने अटलजींना विचारलं ”तुम्ही अजून लग्न का केलं नाहीं?

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आता आपल्यात नाहीत परंतू त्यांच्या बऱ्याच आठवणी मात्र आहेत. कुशाग्र राजकीय बुद्धिमत्ता आणि हजरजबाबीपणा यासाठी अटलजींची ख्याती संपूर्ण देशभरात आहे. वाजपेयी यांनी एक पत्रकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. परंतु १९५१ मध्ये त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि पत्रकारिता सोडली. राजकीय क्षेत्राव्यतिरिक्त वाजपेयी हे एक ख्यातनाम कवी देखील होते. हार नही…

पुस्तक परिचय: पटेली

शहारलेल्या जमिनीच्या स्पर्शाने गळून पडणारी पटेली.. वेगातला वगळ जाणवल्याने आक्रसलेली पटेली.. उभारण्या अगोदरच जमीनदोस्त होणाऱ्या स्वप्नांना आजचे ताण पेलत नाही हे ठणकावून सांगणारी पटेली.. कप्पे नाकारून ‘आजचं’ काही बोलू पाहणारे ‘अविनाश उषा वसंत’ पटेलीतून नव्या भानांचे अवकाश उलगडू पाहतात. मुंबईशी अगदीच पुसटसा संबंध आलेला वाचक म्हणून कादंबरी समजताना कसरत होणे स्वाभाविकच, पण २४ जानेवारीच्या संध्याकाळी…