सूर्याच्या चाहत्यांकडून ट्रेंड करण्यात येणारा #WeWantSuriya42Update हा प्रकार काय आहे?

सूर्याच्या चाहत्यांकडून ट्रेंड करण्यात येणारा #WeWantSuriya42Update हा प्रकार काय आहे?

साऊथ सिनेमाचे चाहत्यांचे तेथील अभिनेत्यांवर असणारे प्रेम जगजाहीर आहे. जय भीम आणि सुरई पोट्टारु या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांचा अभिनेता सूर्या चर्चेत आहे. सूर्याच्या चाहत्यांकडून ट्विटर वरती हा हॅशटॅग चालवण्यात येत आहे. पूर्वीप्रमाणेच या वेळीही साऊथ सिनेमांच्या चाहत्यांनी त्यांच्या लाडक्या नायक ‘सर्वानन शिवकुमार’ किंवा त्याच्या स्टेज नावाने ओळखला जाणाऱ्या ‘सूर्या’ चा येणारा चित्रपट “सूर्या ४२”…

‘पुणे शहराचे नाव जिजाऊ नगर करा,’ अमोल मिटकरींची मागणी

‘पुणे शहराचे नाव जिजाऊ नगर करा,’ अमोल मिटकरींची मागणी

मागील काही दिवसांपूर्वी अहमदनगरच्या नामांतराचा मुद्दा चांगलाच गाजला होता. या शहराचे नाव अहिल्यानगर करा अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. असे असतानाच आता पुण्याचे नाव बादलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुणे शहराचे नाव जिजाऊ नगर करावे, अशी मागणी केली आहे. तर या नावास हिंदू महासंघाने विरोध…

आपल्याच वडिलांना निवडणुकीतून माघार घ्यायला लावणारे सत्यजीत तांबे कोण आहेत?
|

आपल्याच वडिलांना निवडणुकीतून माघार घ्यायला लावणारे सत्यजीत तांबे कोण आहेत?

राज्यात थोड्याच दिवसात शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूका होणार आहेत. त्यासाठी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख होती. एकनाथ शिंदेंची बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपा एकत्रित निवडणूक लढवणार आहे तर विरोधक असणाऱ्या महाविकासआघाडीने देखील एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा महाविकासआघाडीकडून काँग्रेसला देण्यात आली. यानंतर काँग्रेसने उमेदवार म्हणून पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान…

रितेश जिनिलियाच्या ‘वेड’ची घोडदौड कायम, मराठी सिनेविश्वात रचले अनेक विक्रम

रितेश जिनिलियाच्या ‘वेड’ची घोडदौड कायम, मराठी सिनेविश्वात रचले अनेक विक्रम

वेड या चित्रपटाने फक्त महाराष्ट्र नव्हे तर अख्या देशाला त्याच वेड लावले आहे. प्रदर्शनाच्या १३व्या दिवशी सुद्धा वेड या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुरवातीच्या वीकेंडच्या तुलनेत अधिक कमाई केली आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा-देशमुख यांच्या ‘वेड’ चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीत अनेक विक्रम आहेत. २०१६ साली आलेल्या नागराज मंजुळेच्या सैराट या सिनेमाच्या दुसऱ्या आठड्यातील वीकेंडच्या कमाई पेक्षा…

मी बॉक्स ऑफिस क्लॅशची काळजी करत नाही, ‘गांधी गोडसे: एक युद्ध’ चित्रपटाच्या दिगदर्शकाचे मोठे वक्तव्य

मी बॉक्स ऑफिस क्लॅशची काळजी करत नाही, ‘गांधी गोडसे: एक युद्ध’ चित्रपटाच्या दिगदर्शकाचे मोठे वक्तव्य

११ जानेवारी रोजी राजकुमार संतोषी यांचा दिगदर्शकीय पुनरागमन (डायरोक्टेरियल कमबॅक) ”गांधी गोडसे: एक युद्ध” चित्रपटाचा ट्रेलर लाँच प्रदर्शित करण्यात आला. गांधी की गोडसे हा भारतीय इतिहासासाठी सदैव विवादाचा मुद्दा ठरलेला आहे. या विषयाला घेऊन चित्रपटाच्या दृष्टिकोनाने विचार करणे हीच एक धाडसी कामगिरी आहे. या विषयाची निवड करून,विचार विनिमय केल्याशिवाय कुठलाच निर्माता किवां दिग्दर्शक चित्रपट उभा…

प्रकाश आंबेडकरांचा भाजपबरोबर वाद, तरी देणार एकनाथ शिंदेंना साथ?

प्रकाश आंबेडकरांचा भाजपबरोबर वाद, तरी देणार एकनाथ शिंदेंना साथ?

वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटात युतीच्या चर्चा सुरू असतानाच वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. बुधवारी रात्री जवळपास अडीत तास या दोघांमध्ये खलबंत सुरू होती. अशी माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, या भेटीबाबत शिंदे गटाचे प्रवक्ते…

राजामौलीच्यां RRR सिनेमातील “नातू-नातू” गाण्याने कोरले ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कारावर नाव

राजामौलीच्यां RRR सिनेमातील “नातू-नातू” गाण्याने कोरले ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कारावर नाव

८० वा गोल्डन ग्लोब २०२३ अवॉर्ड्स ‘द बेव्हरली हिल्टन’ या ठिकाणी ११ जानेवारी रोजी पार पडला. पुरस्कार सोहळे नेहमीच प्रेक्षकांसाठी खास असतातच पण ह्या वेळेस हा सोहळा भारतीय सिनेसृष्टीसाठी काहीसा जास्त खास ठरला. जगाला नातू-नातू च वेड लावत, ‘एस.एस.राजामौली’ दिग्दर्शित ‘आर.आर.आर’ मधील नातू-नातू गाण्याने ”सर्वोत्तम मूळ गाणे” (मोशन पिक्चर्स) ह्या श्रेणी अंतर्गत अवॉर्ड स्वीकारला. ‘…

पवारांचे विश्वासू आणि राष्ट्रवादीचा मुस्लीम चेहरा, कोण आहेत हसन मुश्रीफ?

पवारांचे विश्वासू आणि राष्ट्रवादीचा मुस्लीम चेहरा, कोण आहेत हसन मुश्रीफ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कागल आणि पुण्यातील घरांवर अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने छापेमारी केली. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर ही छापेमारी झाल्याचं सांगण्यात येत आहे. आज सकाळपासून ईडीने आपलं धाडसत्र सुरु केलं. या धाडसत्राची माहिती मिळाल्यानंतर मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांकडून कागल बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान,…

ह्रितिक @४९: वाढत्या वयाबरोबर अधिकचं तरुण होत चाललेला अभिनेता..!

ह्रितिक @४९: वाढत्या वयाबरोबर अधिकचं तरुण होत चाललेला अभिनेता..!

एखादा चित्रपट पाहताना पाहणारे प्रेक्षक त्याच्या नायाकाकडून काय अपेक्षा करतात? तो देखणा असावा, पीळदार शरीरयष्टिचा, ज्याला नाचता येईल उत्तम अभिनय येईल, फाईट करता येईल. असा ‘हिरो’ सर्वांना अपेक्षित असतो. जे फक्त मनोरंजनासाठी पाहतात किंवा ज्यांना मसालेदार सिनेमे आवडतात किमान त्यांच्या साठी तरी. असा प्रत्येक बाबतीत परिपूर्ण असलेला नट खूप कमी वेळा सापडतो.आणि जेव्हा अश्या परिपूर्णतेचा…

ट्विटरवर पठाण ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ हा ट्रेंड का करतोय?

ट्विटरवर पठाण ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ हा ट्रेंड का करतोय?

बॉलीवूड आणि त्यात होणारे बदल हे लोकांसाठी आता काही नवीन राहिलेले नाहीयेत. प्रत्येक प्रदर्शित झालेला चित्रपट,गाणं किवां नाटक घेऊन येतात एक नवीन ट्रेंड जे ट्विटर किंवा इतर सामाजिक माध्यमांवर हॅशटॅग्स च्या रूपात धुमाकूळ घालतात.अश्याच एका नवीन ट्रेंड ची सुरुवात पठाण चित्रपटाने देखील केलेली आहे. ”पठाण” चित्रपटामध्ये हिंदी सिनेमाविश्वातला सुपरस्टार अभिनेता शाहरुख खान तब्बल ४ वर्षांनंतर…

सत्तासंघर्षावरील सुनावणीवर संजय राऊत म्हणतात…

सत्तासंघर्षावरील सुनावणीवर संजय राऊत म्हणतात…

शिवसेनेतील फूट आणि राज्यातील सत्तासंघर्षांसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, सत्तासंघर्षाचा पेच आणखी लांबणीवर पडला आहे. कारण या प्रकरणाची सुनावणी १४ फेब्रुवारीला होईल, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांनी दिली आहे. दरम्यान, याबाबत खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले राऊत: आमचं घटनेवर प्रेम आहे. १४ फेब्रुवारीपासून…

बर्थडे स्पेशल: विविध कलेतला मुसाफिर पोहोचला पन्नाशीत !!

बर्थडे स्पेशल: विविध कलेतला मुसाफिर पोहोचला पन्नाशीत !!

“दिलो मे अपनी बेताबिया लेकर चल रहे हो, तो जिंदा हो तुम.” हा जिंदगी ना मिलेगी दोबारा या सिनेमातील संवाद सगळ्यांच्या परिचयाचा आहे. हा “संवाद” आपल्या विशिष्ट आवाजात आणि शैलीत लोकांपर्यंत पोहोचवणारा अभिनेता म्हणजे फरहान अख्तर. आज फरहान अख्तर चा वाढदिवस. फरहान हा एक अभिनेता म्हणून सगळ्यांच्याच परिचयाचा आहे. पण या बरोबरच फरहान हा एक…

दिल्लीतील महापौरपद ‘भाजप’ आणि ‘आप’साठी इतके महत्वाचे का आहे?

दिल्लीतील महापौरपद ‘भाजप’ आणि ‘आप’साठी इतके महत्वाचे का आहे?

नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली महानगरपालिका निवडणूकीत आम आदमी पार्टीने भाजपचा पराभव करत प्रचंड बहुमताने विजय मिळवला आहे. तब्बल १५ वर्षांपासून येथे भारतीय जनता पार्टीची सत्ता होती. भाजपाच्या या अभेद्य सत्ताकेंद्राला सुरुंग लावण्याचं काम आम आदमी पार्टीने केलं. या निवडणुकीत आम आदमी पार्टीने बहुमत मिळवलं असलं तरी महापौर निवडीवरून दोन्ही पक्ष आमने-सामने आले आहेत. महापौर निवडीवरून…

शरद पवार मोठे नेते, पण.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं पवारांना प्रत्युत्तर
|

शरद पवार मोठे नेते, पण.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं पवारांना प्रत्युत्तर

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपाला खडसावलं होतं. सत्ता आल्यावर जमिनीवर पाय ठेवून वागायचं असतं. आता सत्ता आलेल्यांची विधानं वेगळी आहेत. काही लोकं तुरुंगात टाकणार, तर काही जामीन रद्द करु, असा इशारा देत आहेत. मात्र, ही राजकीय नेत्यांची कामं नाहीत, असा शरद पवार यांनी म्हटलं होतं. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी…

लाज नसलेल्या माणसाला निर्लज्ज नाही तर काय म्हणायचे? आव्हाडांचा विधानसभा अध्यक्षांना सवाल
|

लाज नसलेल्या माणसाला निर्लज्ज नाही तर काय म्हणायचे? आव्हाडांचा विधानसभा अध्यक्षांना सवाल

सोमवारपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. कोरोनाच्या काळात नागपूर येथे अधिवेशन घेण्यात आले नव्हते त्यामुळे पहिल्यांदाच होत असलेल्या नागपूर अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष लागले होते. परंतु,मागील चार दिवसांत विरोधक आणि सत्ताधारी पक्षात खडाजंगी पाहायला मिळाली. पहिल्याच दिवशी विरोधी पक्षातील नेत्यांनी नागपूर एनआयटी भूखंड घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केल्याने सभागृहात गदारोळ झाला. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर…

जयंत पाटील यांना निलंबित करा; मुखमंत्र्यांची विधानसभा अध्यक्षांकडे मागणी

जयंत पाटील यांना निलंबित करा; मुखमंत्र्यांची विधानसभा अध्यक्षांकडे मागणी

अध्यक्ष तुम्ही निर्लज्जपणा करु नका’ असं विधान केल्याने राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांना निलंबित करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. जयंत पाटील यांनी केलेल्या विधानावरुन सभागृहात एकच गदारोळ झाला आहे. यानंतर मुख्यमंत्र्यांनी जयंत पाटील यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. यासोबत गिरीश महाजन यांनीही ही मागणी केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षनेते…

दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचे विधानसभेत पडसाद, नितेश राणे- भरत गोगावले आक्रमक

दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचे विधानसभेत पडसाद, नितेश राणे- भरत गोगावले आक्रमक

दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचे पडसाद आज विधिमंडळ अधिवेशनातही पाहायला मिळाले. भरत गोगावले आणि नितेश राणे यांनी विधानसभेत बोलताना हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर विधिमंडळात गोंधळ पाहायला मिळाला. दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची केस रिओपन करा. या प्रकरणाची पुन्हा एकदा कसून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी सभागृहात केली आहे. भरत गोगावले यांनी दिशा सालियान…

पुन्हा होणार मास्कची सक्ती? देशातील कोणत्या महत्वाच्या ठिकाणी मास्क सक्ती करण्यात आली?

पुन्हा होणार मास्कची सक्ती? देशातील कोणत्या महत्वाच्या ठिकाणी मास्क सक्ती करण्यात आली?

चीनमधील कोरोनाचा होणारा उद्रेक बघता भारताने आतापासूनच सतर्कता घेण्यास सुरवात केल्याचे पाहायला मिळतेय. त्यामुळेच आता केंद्रीय आरोग्य विभागाच्या वतिने कोरोनाच्या स्थिती बाबत आढावा बैठक घेत खबरदारी म्हणून गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा अशा सूचना करण्यात आल्या आहेत. या बरोबरच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसद परिसरात मास्क सक्तीचा केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून मास्क सक्ती उठवण्यात…

शेवाळेंनी केलेल्या आरोपांना शुद्ध मराठीत…, संजय राऊतांचं टीकास्र

शेवाळेंनी केलेल्या आरोपांना शुद्ध मराठीत…, संजय राऊतांचं टीकास्र

महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच शिंदे गटाचे बंडखोर खासदार राहुल शेवाळे यांनी बुधवारी लोकसभेत आणि नंतर पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राहुल शेवाळेंचे आरोप संसदेच्या कामकाजातून काढून टाकले असले, तरी त्यानंतर ठाकरे गटाकडून शेवाळेंच्या आरोपांचा जोरदार…

खासदार नवनीत राणांना सत्र न्यायालयाचा धक्का, जातप्रमाणपत्रासंबंधी वॉरंट कायम

खासदार नवनीत राणांना सत्र न्यायालयाचा धक्का, जातप्रमाणपत्रासंबंधी वॉरंट कायम

जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी खासदार नवनीत राणांना मुंबई सत्र न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांनी दाखल केलेला दोष मुक्ततेसाठी अर्ज न्यायालयाने आज फेटाळला. शिवडी न्यायालयाचा निर्णय मुंबई सत्र न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आला आहे. तसेच शिवडी न्यायालयाने जारी केललं अजामीनपात्र वॉरंटही योग्य असल्याचं सांगत सत्र न्यायालयाने त्या वॉरंटला स्थगिती देण्यास नकार…

आदित्य ठाकरेंनी रिया चक्रवर्तीला केले 44 फोन कॉल, सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून राहुल शेवाळेंचा गंभीर आरोप

आदित्य ठाकरेंनी रिया चक्रवर्तीला केले 44 फोन कॉल, सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून राहुल शेवाळेंचा गंभीर आरोप

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी  युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रिया चक्रवर्तीच्या फोनवर एयू नावाने 44 कॉल आले होते. एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असं बिहार पोलिसांनी सांगितलं आहे, असा गंभीर आरोप राहुल शेवाळे यांनी केलाय. लोकसभेत बोलताना राहुल शेवाळे यांनी हा गंभीर आरोप केलाय….

भुजबळांच्या फोटोशी छेडछाड करणाऱ्या भातखळकरांवर कारवाई करा… जयंत पाटलांची मागणी

भुजबळांच्या फोटोशी छेडछाड करणाऱ्या भातखळकरांवर कारवाई करा… जयंत पाटलांची मागणी

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांचा सांताक्लॉजीची टोपी घातलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. दरम्यान, भुजबळांच्या फोटोशी छेडछाड केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे. तसेच हा प्रकार गंभीर असून अतुल भातखळकर यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी आज विधानसभेत केली….

मोठी घोषणा !लवकरच होणार राज्यात डॉक्टर,तंत्रज्ञांच्या ४ हजार जागांची भरती

मोठी घोषणा !लवकरच होणार राज्यात डॉक्टर,तंत्रज्ञांच्या ४ हजार जागांची भरती

नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने महत्वाची घोषणा केली आहे. राज्याचे वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यात चार हजार डॉक्टरांची आणि तंत्रज्ञांची भरती करणार असल्याची घोषणा विधानसभेत केली. प्रक्रिया टीसीएसच्या माध्यमातून पार पडणार आहे. नागपूर अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत घोषणा केली. आम्ही एमपीएसच्या माध्यमातून ३०० डॉक्टरांची भरती केली. पण…

यांना जर मस्ती चढली असेल तर आपणही…; सभागृहात जयंत पाटील संतापले

यांना जर मस्ती चढली असेल तर आपणही…; सभागृहात जयंत पाटील संतापले

सीमाभागातील मराठी माणसांवर पाळत ठेवली जात आहे, जाणीवपूर्वक मराठी माणसाला त्रास दिला जातो आहे. याचा आपण जाब विचारला पाहिजे, कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्या भाषेत बोलत आहेत त्याच भाषेत त्यांना उत्तर द्यायला पाहिजे अशा शब्दात माजी मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटक सरकारला ठणकावून सांगितले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर माजी मंत्री जयंत पाटील यांनी स्थगन प्रस्ताव मांडला होता….

वसंत मोरेंची तलवार पुन्हा म्यान? मोरेंनी स्पष्ट केली भूमिका

वसंत मोरेंची तलवार पुन्हा म्यान? मोरेंनी स्पष्ट केली भूमिका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुण्यातील कट्टर समर्थक, माजी शहर अध्यक्ष, नगरसेवक वसंत मोरे पुन्हा एकदा चर्चेत आहेत. वसंत मोरे गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी त्यांना पक्षात प्रवेश करण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे वसंत मोरे राष्ट्रवादीत प्रवेश कऱणार का? अशी चर्चा रंगली आहे. यादरम्यान वसंत मोरेंची नाराजी दूर…

गुजरातमध्ये सारखं कमळचं कसं काय फुलतंय?

गुजरातमध्ये सारखं कमळचं कसं काय फुलतंय?

काल गुजरात आणि हिमाचल निवडणुकांचे निकाल लागले ज्यात भाजपने गुजरातमध्ये आपली सत्ता कायम राखली तर काँग्रेसला सगळ्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. हिमाचलप्रदेशात काँग्रेसला भाजपकडून सत्ता खेचून घेण्यात यश आले हाच काय तो काँग्रेससाठी सुखावणारा निकाल. मात्र, असे असले तरी सलग २७ वर्षे गुजरात आपल्या ताब्यात ठेवणाऱ्या भाजपाला पराभूत करणे गेली दोन दशके काँग्रेसला जमले…

पंढरीचा वारकरी, विधानसभेचा मानकरी.. अनंतात विलीन !

पंढरीचा वारकरी, विधानसभेचा मानकरी.. अनंतात विलीन !

पंढरीचा वारकरी विधानसभेचा मानकरी..! अशी ओळख असलेले मावळ तालुक्यातील अजातशत्रू व्यक्तिमत्व माजी आमदार दिगंबर भेगडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. सर्वसामान्य नेता म्हणून ते तालुक्यात परिचित होते. त्यांच्या निधनाने मावळ तालुका पोरका झाला असून मावळसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. मावळ तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या सलग २५ वर्षांच्या सत्तेच्या काळात माजी आमदार भेगडे…

भाजपची दीड दशकाची सत्ता खालसा, दिल्लीत ‘आप’चा झेंडा

भाजपची दीड दशकाची सत्ता खालसा, दिल्लीत ‘आप’चा झेंडा

दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने कमाल केली आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाला बहुमत मिळालं आहे. यासोबतच दिल्ली महापालिकेवरील भाजपची दीड दशकाची सत्ता संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत मुख्य लढत आप, भाजप आणि काँग्रेसमध्येच होती. भाजपने कडवी लढत दिली आहे. तर काँग्रेसला दुहेरी आकडा गाठण्यासाठी अपयश आले आहे. दिल्ली महापालिकेच्या २५०जागांसाठी ४डिसेंबर रोजी…

तोंड आवरा, नाहीतर पुन्हा तुरुंगात आराम करायला जायची वेळ येईल; शंभूराज देसाईंचा संजय राऊतांना इशारा

तोंड आवरा, नाहीतर पुन्हा तुरुंगात आराम करायला जायची वेळ येईल; शंभूराज देसाईंचा संजय राऊतांना इशारा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न सध्या चांगलाच तापला असून याच मुद्द्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली होती. या टीकेला शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात जावे लागू शकते, असा अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबाबत संजय राऊत हे एकनाथ शिंदे यांच्यावर नाहक…

शरद पवार यांचं बोम्मई यांना २४तासांचं अल्टीमेटम,हल्ले थांबवा अन्यथा…

शरद पवार यांचं बोम्मई यांना २४तासांचं अल्टीमेटम,हल्ले थांबवा अन्यथा…

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून चिथावणीखोर वक्तव्ये होत असल्याने सीमावाद उफाळून आला आहे. आज कर्नाटकात महाराष्ट्रातल्या गाड्यांवर हल्ले करण्यात आल्याने महाराष्ट्रातील संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. येत्या २४तासात कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्राच्या तसेच मराठी भाषिक जनतेवर हल्ले करणं थांबवण्यात आलं नाही तर परिस्थिती चिघळू शकते. महाराष्ट्रातील जनतेच्या संयमाचा बांध फुटला तर त्याला सर्वस्वी केंद्र…