पार्थ पवार- शंभूराज देसाईंच्या भेटीवर पडळकरांची खोचक प्रतिक्रिया,म्हणाले..

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे सूपुत्र पार्थ पवार यांनी शिंदे सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या भेटीनंतर चर्चेला उधाण आलं आहे. पार्थ पवारांनी शंभूराज देसाईंची भेट का घेतली? याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, शंभूराज देसाई आणि पार्थ पवार यांच्यात तब्बल वीस मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे. यावर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

कोल्हापुरात बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, “पार्थ पवारांनी शंभूराज देसाईंची भेट कशासाठी घेतली माहिती नाही. पण, पार्थ पवार यांच्या मनात अस्वस्थता आहे. कारण, त्यांचे बंधू दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन विधानसभा सदस्य झाले. ते आता क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष झाले असून, बारामती अ‍ॅग्रो सारखी संस्था त्यांच्याकडं आहे. त्यामुळं त्यांच्या मनात खंत असेल.”

“पार्थ पवार यांचा लोकसभेत अडीच लाखांच्या मतांनी पराभव झाला. राजकीय स्थिरता मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत असतील. घरात आजोबांकडून अन्याय होत असल्याने, न्याय मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे,” असा टोला गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे.

पार्थ पवारांनी शंभूराज देसाई यांचा शासकीय बंगला असलेल्या पावनगड येथे जाऊन भेट घेतली. त्याठिकाणी या दोघांमध्ये २० मिनिट चर्चा झाली. खासगी कामासाठी ही भेट असल्याचं पार्थ पवार यांनी स्पष्ट केले असले तरी या भेटीची चर्चा थांबण्याचे नाव घेत नाहीये.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *