नाशिक पालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजन टॅंक लिक; रुग्णांची प्रकृती चिंताजनक

नाशिक : राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर पुण्या सारख्या शहरात ऑक्सिजन अभावी रुग्णांना इतर ठिकाणी हलविण्यात येत आहे. असं असतांना नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टॅंक मधून गळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
नाशिक शहरातील महत्वाचे समजले जाणारे झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंकला गळती लागल्याने हजारो लिटर ऑक्सिजन वाया गेले आहे. ही घटना आज दुपारी घडली. यावेळी रुग्णालयात १३१ जण उपचार घेत आहे. यातील चार ते पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. तर काही जणांना इतर रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
- नाशिक पालिकेचं असलेलं झाकीर हुसेन रुग्णालय
- या रुग्णालयात ऑक्सिजनवर १३१ रुग्ण
- तर व्हेंटिलेटरवर आणि अत्यवस्थ ६७ रुग्ण
- २० KL क्षमतेची ऑक्सिजन टाकी
- ऑक्सिजन टॅंक लीक झाल्यानं, सर्वत्र पसरला गॅस
- ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा तास झाला खंडित