Sunday, September 25, 2022
Homeब-बातम्यांचाटाटा पुन्हा एकदा आले देशासाठी धावून; वाढवला ऑक्सिजनचा पुरवठा!

टाटा पुन्हा एकदा आले देशासाठी धावून; वाढवला ऑक्सिजनचा पुरवठा!

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेक रुग्णालयांध्ये मेडिकल ऑक्सिजनचा तुटवडा पाहायला मिळतो आहे. रुग्णालयातील ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेता आता टाटा स्टीलने कोव्हिड रुग्णांच्या उपचारांसाठी दररोज केला जाणारा पुरवठा वाढवला आहे. टाटा स्टीलने आता पुरवठ्याची क्षमता ६०० टनवरून ८०० टन केली आहे.
टाटा स्टीलने सोमवारी अशी माहिती दिली होती की, रुग्णालयांसाठी ऑक्सिजन पुरवठा वाढवून ६०० टन केला आहे त्यांनतर पुरवठ्याच्या क्षमतेत आणखी वाढ करून तो ८०० टन इतका करण्यात आला आहे. काल टाटा स्टीलने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.

टाटा स्टीलने ट्वीट करत अशी माहिती दिली आहे –
टाटा स्टीलकडून लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कोव्हिड विरोधात संघर्ष जारी राहील. आम्ही भारत सरकार आणि राज्य सरकारांसह मिळून काम करत आहोत. जेणेकरून मागणी पूर्ण केली जाईल आणि अमुल्य जीव वाचवला जाईल.

टँकर्सचे मेडिकल ऑक्सिजन टँकरमध्ये केलं जात आहे रुपांतरण
स्टील कंपन्यांनी राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी नायट्रोजन आणि एर्गोन टँकर्सचे रुपांतरण लिक्विड ऑक्सिजन टँकर्समध्ये केले आहे. जेणेकरून वेगाने ऑक्सिजनचा पुरवठा केला जाईल. कंपन्यांनी जवळपास ८३४५ मेट्रिक टन क्षमतेचे ७६५ नायट्रोजन आणि ७६४२ मेट्रिक टन क्षमतेचे ४३४ एर्गोन टँकर लिक्विड ऑक्सिजन टँकर्समध्ये रुपांतरीत केले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments