रुग्णांना ऑक्सिजन मिळत राहावा म्हणून ‘ऑक्सिजन मॅन’ ने विकली SUV

Oxygen Man sells SUVs to keep patients oxygenated
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई : कोरोना व्हायरसाच्या रुग्णांसाठी ऑक्सिजनचा तुटवडा होत असल्याचं चित्र संपूर्ण देशात बघायला मिळत आहे. अशात सरकारच्या प्रयत्नांव्यतिरिक्त काही लोक असे देखील आहे जे आपल्या पातळीवर लोकांची मदत करत आहे. त्यापैकी एक मुंबईतील शाहनवाज शेख आहे. शेख यांच्याकडून मिळत असलेल्या मदतीमुळे त्यांची ऑक्सिजन मॅन या नावाने ओळख निर्माण झाली आहे. ते त्यांच्या स्तरावर लोकांपर्यंत ऑक्सिजन पोचवण्यासाठी सतत कार्यरत आहे. रुग्णांना ऑक्सिजन सप्लाय सुरु राहावा यासाठी शेख यांनी आपली एसयूव्ही विकली. २२ लाखाची गाडी विकल्यानंतर १६० ऑक्सिजन खरेदी करुन रुग्णांपर्यंत पोहचवले.
मीडिया रिपोर्ट्सप्रमाणे शेख यांच्याकडे सतत ऑक्सिजन मागणीचे कॉल येत आहेत. अशात ते सर्वांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु मर्यादित स्त्रोतांमुळे ते केवळ काही लोकांना मदत करू शकतात. इतकेच नव्हे तर रूग्णांना ऑक्सिजन पुरवठा सुरू ठेवण्यासाठी त्यांनी आपली एसयूव्हीदेखील विकली आहे. त्यांनी आपली कार २२ लाख रुपयांना विकल्यानंतर १६० ऑक्सिजन सिलिंडर्स खरेदी करुन रुग्णांपर्यंत पोहोचविले.
रिपोर्ट्सप्रमाणे मागील वर्षी त्यांच्या एका मित्राच्या पत्नीला ऑक्सिजनची गरज भासली होती परंतू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ऑटो रिक्शा मध्येच तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर त्यांनी लोकांची मदत करण्याचा निश्चय घेतला. आज परिस्थिती अशी आहे की त्यांनी गरजूंसाठी एक हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. या बरोबरच लोकांना योग्य वेळी मदत मिळावी यासाठी वॉर रूम देखील तयार केली गेली आहे.
त्यांनी आत्तापर्यंत ४ हजाराहून अधिक लोकांपर्यंत ऑक्सिजन सिलिंडर पोहोचवले आहेत. ते म्हणतात की यापूर्वी ऑक्सिजनसाठी कॉलची संख्या ५० पर्यंत होती, परंतु आता ती ५०० पेक्षा जास्त झाली आहे. गेल्या वर्षी कोरोना व्हायरस साथीच्या आजाराच्या सुरूवातीपासून त्यांनी गरजूंना ऑक्सिजन सिलेंडर पोहचवले होते. दरम्यान त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला, त्यानंतर त्याने आपली कार विकायचा निर्णय घेतला.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *