नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती; २२ जणांचा मृत्यू

Oxygen leak at Zakir Hussain Hospital in Nashik; 22 killed
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

नाशिक : राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असतांना नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टॅक मधून अचानक गळती झाली. यात २२ रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंक मधून गळती थांबविण्यात आली असून पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. या घटनेत २२ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णालयात १५० रुग्ण व्हेंटीलेटर आणि ऑक्सिजन वर आहेत. त्यापैकी १३१ जण ऑक्सिजन आणि १५ जण व्हेंटीलेटर होते. या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले. तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या घटनेत २२ रुग्णांचा मूत्यू झाल्याचे स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीच्या आधारे सांगितले.
नाशिक शहरातील महत्वाचे समजले जाणारे झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंकला गळती लागल्याने हजारो लिटर ऑक्सिजन वाया गेले आहे. ही घटना आज दुपारी घडली.

  • नाशिक पालिकेचं झाकीर हुसेन रुग्णालय
  • या रुग्णालयात ऑक्सिजनवर १३१ रुग्ण
  • तर व्हेंटिलेटरवर आणि अत्यवस्थ १५ रुग्ण
  • २० KL क्षमतेची ऑक्सिजन टाकी
  • ऑक्सिजन टॅंक लीक झाल्यानं, सर्वत्र पसरला गॅस
  • ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा तास झाला खंडित

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *