Wednesday, September 28, 2022
Homeब-बातम्यांचाभुजबळांनी तयार केलेल्या जंबो कोविड सेंटरचा इतर संस्थांनी आदर्श घ्यावा - शरद...

भुजबळांनी तयार केलेल्या जंबो कोविड सेंटरचा इतर संस्थांनी आदर्श घ्यावा – शरद पवार

मुंबई : कोरोना बाधितांना बेड मिळणे अवघड झाले आहे. याची दखल घेत छगन भुजबळ यांनी नाशिक मध्ये १८० बेडचे जंबो कोविड सेंटर उभे केले आहे. या सेंटरचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांचे कौतुक केले.
यावेळी शरद पवार म्हणाले, भुजबळ यांनी हाती घेतलेलं उपक्रम अतिशय स्तुत आहे. हा उपक्रम कोरोनाच्या लढाईत काम करणाऱ्या उत्तर संस्थेसाठी प्रेरणादायी ठरेल अशी शरद पवार म्हणाले. छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने व नेतृत्वाखाली त्यांच्या सहकाऱ्यांच्या कष्टाने नाशिकमध्ये उभे केलेल्या कोविड केअर सेंटरचे अनावरण करताना मनापासून आनंद झाला. संपूर्ण विश्वात महामारीचं संकट असताना संकटग्रस्तांना आधार देण्याचे जे काम सुरू आहे त्यात मोलाचा भाग आज नाशिकमध्ये पाहायला मिळतो असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात अनेक उत्तम संस्था, मोठे उद्योग, संस्था आहेत. या सगळ्यांनी भुजबळ नॉलेज सिटी मधील हा उपक्रम डोळ्यांसमोर ठेवून इतक्या मोठ्या प्रमाणात जरी शक्य नसल्यास काहीना काही प्रमाणात असे सेंटर आपल्या भागातही निर्माण करू शकलो तर सर्व समाज घटकांमध्येही वेगळेपणा सिद्ध करण्यासाठी योग्य संदेश जाईल. असेही शरद पवार यांनी सांगितले.

भुजबळ नॉलेज सिटी, नाशिक महानगरपालिका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, समता परिषद आणि इतर सहकारी यांच्या प्रयत्नाने उभे करण्यात आलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण सेंटरमध्ये १८० ऑक्सिजन बेड व १०५ सीसीसी अशा २८५ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून उभे केलेली कोविड सेंटर हे केवळ रुग्णाच्या विलगीकरणासाठी असतात. पण स्वयंसेवी संस्था आणि राजकीय पक्षाने सुरू केलेलं व ऑक्सिजन असलेले नावीन्यपूर्ण कोविड सेंटर नाशिकमध्ये प्रथमच उभे केलं असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

गुजरात मधून उपकरणे मागविली
या सेंटरमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था आहे. यासाठी स्वतंत्र जोडणी केली आहे. यासाठीचे मटेरिअल गुजरातमधील सुरत येथून मागवण्यात आले व रात्रंदिवस काम करून ही ऑक्सिजन लाइन बसवण्यात आली. यासाठी आवश्यक असलेले व्हेपरायझेशन यंत्रणा बडोद्यावरून मागविण्यात आले. तसेच ऑक्सिजन व्यवस्थेसाठी लागणारे ड्युरा सिलेंडर कर्नाटकातील येल्लुर इथून आणले. पुरेशा ऑक्सिजनसाठ्यासाठी आवश्यक असलेले १ केएल क्षमतेचे ऑक्सिजन टँक पुणे येथून आणले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments