जगावर अध्यात्माची छाप पाडणाऱ्या ओशोंचे बॉलीवूडमध्येही आहेत अनुयायी

Osho
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

पुणे : ओशो आश्रमातील भूखंड विक्रीचा मुद्दा चर्चेत आला आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील ओशो  आश्रम नेहमी चर्चेत राहिले आहे. १९ जानेवारी १९९० रोजी ओशोचा मृत्यू झाला. ओशोला जाऊन आज जवळपास ३१ वर्ष झाली तरीही ओशो आणि त्यांच्या आश्रमाबद्दल आकर्षण कमी होत नाहीये. आजही जगभरातून अनेक लोक अध्यात्मिक अनुभव घेण्यासाठी त्यांच्या आश्रमाकडे येत असतात.   

ज्ञान, ध्यान आणि अध्यात्माचे एक विलक्षण जग आहे. अनेक माणसं या जगात खेचली जातात. रजनीश म्हणजे ‘ओशो’ यांनी या अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये आपले एक अजरामर स्थान निर्माण केले आहे. ओशोंनी १९६० ला प्रवचन देण्यास सुरूवात केली. व्यवसायाने ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. प्रवचनासाठी त्यांनी देशभर प्रवास केला. महात्मा गांधी, समाजवाद आणि संस्थात्मक धर्मांवर केली टीका असो किंवा लैंगिकतेसंबंधी व्यक्त केलेले स्पष्ट मत असो. ओशो नेहमी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये चर्चेचा विषय राहिले. १९८१ मध्ये ओशो अमेरिकेत स्थलांतरित झाले.

१९६० पासून आचार्य रजनीश म्हणून ते ओळखले जाऊ लागले. नंतर १९७० व १९८० च्या दरम्यान त्यांना भगवान श्री रजनीश म्हणून ओळख मिळाली. पुढे १९८९ पासून त्यांना जगभरात ओशो अशी ओळख मिळाली. ही ओळख आजही कायम आहे. ओशोंनी १९७४ मध्ये पुण्यात आश्रमाची स्थापना केली. पाश्चात्त्य लोकांच्या येण्याने आश्रम गाजू लागले. ओशोंचे विचार ज्यांना पटले ते त्यांचे अनुयायी होऊन गेले. त्यांच्या अनुयायांमध्ये काही नामवंत भारतीय देखील आहेत. काही निवडक अनुयायांवर एक दृष्टीक्षेप.  

विनोद खन्ना

अभिनेता विनोद खन्ना ओशोंसोबत अमेरिकेतील ओरेगान येथे गेले होते. तिथल्या आश्रमातील बागेत 4 ते ५ वर्ष माळी म्हणून काम केले. इथे त्यांचे नामकरण विनोद भारती म्हणून करण्यात आले. विनोद यांनी आश्रमात भांडी आणि टॉयलेट साफ केले असल्याचे सांगण्यात येते. ज्या मनःशांतीसाठी त्यांनी अध्यात्माची वाट धरली होती ती त्यांना कधी लाभली नसल्याचे चर्चा आहे. संन्यासी होण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांच्या सिनेसृष्टीतील कारकीर्द तर बंद पडलिच पण त्यांच्या कौटुंबिक आयुष्यामध्ये देखील अनेक कलह निर्माण झाले होते. 

महेश भट्ट

‘लहू के दो रंग’ या सिनेमाच्या चित्रीकरणाच्या वेळी महेश भट्ट आणि विनोद खन्ना यांची घट्ट मैत्री झाली. विनोद खन्ना यांच्या मर्सिडीज मध्ये दोघे ओशोंच्या आश्रमात जात होते असे महेश भट्ट यांनी म्हटले आहे. विनोद यांच्या आईच्या निधन झाले होते. त्यानंतर महेश यांनीच मनःशांतीसाठी ओशोंच्या आश्रमात जाण्याचा सल्ला विनोद यांना दिला होता. दोघे आश्रमात संन्यासी म्हणून राहिले. काही दिवसांत मी आश्रम सोडले परंतु विनोदने तिथेच राहण्याचा निर्णय घेतल्याचे भट्ट यांनी सांगितले. 

इरफान खान

दिवंगत अभिनेता इरफान खानने ओशोंच्या पुण्यातील आंतरराष्ट्रीय ध्यान केंद्राला भेट दिली होती. आपल्यावर पूर्वी झालेल्या चुकीच्या संस्कारांना धुवून स्वच्छ करणारे हमाम असे या ध्यान केंद्राचा उल्लेख त्यांनी केला होता. 

फक्त अनुयायीच म्हणून नाही तर काही नामवंत लोकांनी अशो यांच्या पुस्तकांचे प्रकाशन, केंद्रांचे उद्घाटन आणि विविध कार्यक्रमात सादरीकरण देखील केले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी पंतप्रधान इन्द्र कुमार गुजराल, माजी केंद्रीय गृह मंत्री सुशील कुमार शिंदे, माजी केंद्रिय कायदा मंत्री राम जेठमलानी, भाजपचे माजी अध्यक्ष मुरली मनोहर जोशी, गायक राजन मिश्रा आणि कवी प्रीतीश नंदी या नामवंत लोकांनी ओशोंच्या विविध पुस्तकांचे प्रकाशन केले आहे.     

प्रसिद्ध वादक शिवमणी, कवी गुलझार, बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरासिया आणि तबलावादक झाकीर हुसैन सारख्या दिग्गज कलाकारांनी अशोंच्या कार्यक्रमात सादरीकरण केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अध्यात्मिक गुरु दलाई लामा आणि अभिनेता अमिताभ बच्चन यांनी पुण्यातील ओशो तीर्थ मेडीटेशन पार्कला भेट दिली आहे.  


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *