Monday, September 26, 2022
Homeब-बातम्यांचाऑस्कर : क्लोई झाओनं आपल्या जबरदस्त कलाकृतीनं ऑस्करची 'ही' परंपरा मोडून काढली

ऑस्कर : क्लोई झाओनं आपल्या जबरदस्त कलाकृतीनं ऑस्करची ‘ही’ परंपरा मोडून काढली

मुंबई : स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा अनेक ठिकाणी केल्या जातात. प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांना समान स्थान मिळायला हवं अशी भाषणं ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातही केली जातात. तरी देखील ऑस्करमध्ये स्त्री कलाकारांना दुय्यम स्थान दिलं जातं असा आरोप वारंवार केला जायचा. अर्थात हा आरोप काही अंशी खरा देखील होता. कारण गेल्या ९२ वर्षांच्या इतिहासात केवळ एकाच स्त्री कलाकाराला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. परंतु यंदाच्या वर्षी क्लोई झाओनं (Chloe Zhao) आपल्या जबरदस्त कलाकृतीनं ऑस्करची ही परंपरा मोडून काढली. तिनं सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरत एक नवा इतिहास रचला.
ॲकेडमीच्या इतिहासात ऑस्करवर नाव कोरणारी क्लोई आजवरची दुसरी स्त्री दिग्दर्शिका ठरली आहे. तिला नोमोलँड या चित्रपटासाठी ऑस्कर मिळाला आहे. लक्षवेधी बाब म्हणजे क्लोईनं दिग्दर्शित केलेल्या नोमोलँडला एकूण सहा विभागांमध्ये नामांकन मिळालं होतं. त्यापैकी सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शिका आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या तीन पुरस्कारांवर नाव कोरलं. तिनं केलेल्या या विक्रमासाठी जगभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. तिच्या कर्तृत्वामुळं जगभरातील स्त्रियांना चित्रपट निर्मितीसाठी प्रोत्साहन मिळेल असं म्हटलं जात आहे. यापूर्वी २०१० साली केथरिन बिगेलो हिनं हर्टलॉकर या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या विभागात ऑस्कर पटकावला होता.

ऑस्कर विजेत्यांची यादी

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
च्लोए झाओ (Chloe Zhao) चित्रपट : नोमॅडलँड

सर्वोत्कृष्ट अभिनेता
अँथनी हॉपकिन्स (Anthony Hopkins) चित्रपट : मँक

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
फ्रान्सेस मॅकडॉर्मंड (Frances McDormand) चित्रपट : नोमॅडलँड

सर्वोत्कृष्ट चित्रपट
नोमॅडलँड

सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोअर
सोल (Soul)

सर्वोत्कृष्ट मूळ गाणे
फाईट फॉर यू – जुडास अँड द ब्लॅक मसिहा

मानवतावादी पुरस्कार (Humanitarian Award)
टायलर पेरी

सर्वोत्कृष्ट संकलन
साऊंड ऑफ मेटल

सर्वोत्कृष्ट छायाचित्रण
मँक

सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन
मँक

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
यून यू-जंग (मिनारी)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
डॅनियल कलूया (जुडास अँड द ब्लॅक मसिहा)

सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स
टेनेट (Tenet)

सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री – फीचर
माय ऑक्टोपस टीचर

सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री – शॉर्ट सब्जेक्ट
कोलेट (Colette)

सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर फिल्म
सोल (Soul)

सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म
इफ एनिथिंग हॅपन्स आय लव्ह यू (If anything happens i love you)

सर्वोत्कृष्ट लाईव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म
टू डिस्टंट स्ट्रेंजर्स (two distant strangers)

सर्वोत्कृष्ट ध्वनी
साऊंड ऑफ मेटल (Sound Of metal)

सर्वोत्कृष्ट वेशभूषा
मा रेनीज ब्लॅक बॉटम

सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि केशभूषा (मेकअप- हेअर डिझाईन)
मा रेनीज ब्लॅक बॉटम

सर्वोत्कृष्ट इंटरनेशनल फीचर फिल्म
अनदर राऊंड

सर्वोत्कृष्ट आधारित पटकथा (अडाप्टेड स्क्रीनप्ले)
द फादर

सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा (ओरिजनल स्क्रीनप्ले)
प्रॉमिसिंग यंग वुमन

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments