कोल्हापुरातील शिवप्रेम संघटनेचा भारत-इंग्लंड क्रिकेट सामन्यांना विरोध
कोल्हापुर: भारत विरुद्ध इंग्लंडचे आतापर्यंत दोन कसोटी सामने झाले आहेत. त्यात दोन्ही संघांनी १-१ असा समतोल राखला आहे. ४ कसोटी होणाऱ्या या मालिकेत तिसरी कसोटी ही अहमदाबाद येथे होणार आहे. तत्पूर्वी, कोल्हापुरातील शिवप्रेमी संघटनेने भारत-इंग्लंड सामना याला विरोध केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली जगदंबा तलवार सद्या इंग्लंडच्या राणी यांच्या संग्रहात आहे, तर ती तलवार परत द्यावी अशी मागणी ‘शिवदुर्ग संवर्धन आंदोलन’ च्या वतीने करण्यात आली आहे. या सामन्याला गनिमी काव्याने विरोध करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
या संदर्भात बोलताना हर्षल सुर्वे म्हणाले, शिवाजी महाराजांची हि तलवार कोल्हापुरातील छत्रपतींच्या गादीवर छत्रपती चौथे असताना १९७५ मध्ये भारत भेटीवर आलेल्या प्रिन्स ऑफ वेल्स यांना भेट म्हणून देण्यात आली होती. ती तलवार आता परत मिळावी म्हणून गेली अनेक वर्ष पाठपुरावा सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा वर्षापूर्वी तलवार परत आणण्याची घोषणा केली होती. पण, अद्यापही त्या दृष्टीने कारवाही झाली नाही. म्हणून आता हे आंदोलन करावे लागत आहे.