Sunday, September 25, 2022
Homeब-बातम्यांचापुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी रमेश थोरात की नवीन चेहऱ्याला संधी ?

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी रमेश थोरात की नवीन चेहऱ्याला संधी ?

पुणे : पुणे जिल्हा बँक ही भारतातील सर्वात अग्रगण्य बँक असून या बँकेच्या निवडणुकीला पुणे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात देखील महत्व आहे. त्यामुळे या बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असते.

या बँकेच्या संचालक मंडळावर नेहमीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व राहिलेले आहे. किंबहुना राष्ट्रवादीच्या वरचष्म्याखालीच ही बँक चालत असते.
नुकताच जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल लागला असून बँकेच्या अध्यक्षपदी कुणाची नेमणूक केली जाते? याकडे लक्ष लागलेले आहे.

एकूण २१ जागांपैकी १४ जागांवर संचालक बिनविरोध निवडून गेले होते. तर सात जागांसाठी मतदान झाले होते. यापैकी एक लढत मैत्रीपूर्ण होती तर सहा जागांसाठी झालेली निवडणूक महत्वपूर्ण मानली गेली.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील तसेच पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप, भोरचे आमदार संग्राम थोपटे, खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, मंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष रमेश थोरात तसेच बँकेचे विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.

अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी दत्तात्रय भरणे, रमेश थोरात व आप्पासाहेब जगदाळे तसेच दिलीप मोहिते पाटील यांच्या विरोधातील उमेदवारांनी अंतीम क्षणाला अर्ज माघार घेतल्यामुळे त्यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली होती.

उर्वरित सहा जागांसाठी रविवारी मतदान झाले होते. निकाल जाहीर झाल्यांनतर पूर्वापार वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादीकडेच बँकेची पुन्हा सत्त्ता गेलेली आहे. भाजप उमेदवार प्रदीप कंद वगळता इतर सहा जागांवर मविआचे उमेदवार निवडून गेले आहेत. तसेच बिनविरोध निवडून गेलेले आप्पासाहेब जगदाळे वगळता बाकीचे १९ उमेदवार हे मविआचेच असल्याचे पाहायला मिळते.

निवडून आलेल्या एकूण संचालकांपैकी सर्वात जास्त संचालक राष्ट्रवादीचे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून बकेच्या अध्यक्षपदासाठी कुणाचे नाव समोर येईल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मात्र, बिनविरोध जागा करण्याचे व निवडणुकीची जबाबदारी बँकेचे संचालक तथा माजी अध्यक्ष रमेश थोरात यांच्यावर देण्यात आली होती. त्यामुळे बक्षिसी म्हणून पुन्हा एकदा त्यांच्यावरच अध्यक्षपदाची कमान सोपवली जाते की काय? अशी चर्चा आहे.

बँकेच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा त्यांचे विश्वासु सहकारी रमेश थोरात यांना देणार की नवीन चेहऱ्याला संधी देणार याकडे पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या :

‘नाना पटोले, नौटंकी करणे तुमचा स्वभाव, मोदीजींबद्दल तोंड सांभाळून बोला’

कोरोना आणि ओमायक्रोनची लक्षणे एकसारखी ; कसा ओळखणार फरक ?

‘कृषीपंपांचे विज कनेक्‍शन कापण्‍याची मोहीम सुरूच ; सरकारने दिलेल्‍या आश्‍वासनाला महावितरणने फासला हरताळ’

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments